बांगलादेशातील घटनेचा मंगरूळनाथ येथे निषेध

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
मंगरूळनाथ,

Bangladesh incident protest येथील जयस्तंभ चौकात बांगलादेशातील देशातील घटनेचा २८ डिसेंबर रोजी विहिप, बजरंग दल व इतर हिंदू संघटनाचे वतीने तीव्र निषेध करण्यात आला.१८ डिसेंबर रोजी बांगलादेशातील मयमनसिंग जिल्ह्यातील भालुका येथे दिपू चंद्र दास (२७ वर्षे) या हिंदू तरुणाची जमावाकडून अमानुषपणे हत्या करण्यात आली.
 
 
Bangladesh incident protest
 
त्यास जमावाने कारखान्यातून ओढत बाहेर ने़ले व बेदम मारहाण केली आणि त्यानंतर एका झाडाला लटकवून जाळून मारले. त्याच्यावर ईशनिंदेचा खोटा आरोप ठेवण्यात आला होता. परंतु, तपास केला असता ईशनिंदेचा कोणताही पुरावा मिळाला नाही. या निघृण हत्येच्या निषेधार्थ मंगरुळनाथ येथील जयस्तंभ चौकामध्ये समस्त हिंदुत्ववादी संघटना, विहिंप, बजरंग दलाच्या वतीने तीव्र निदर्शने व निषेध करण्यात आला. या क्रूर हत्येमुळे बांगलादेशातील हिंदू सुरक्षित नसून भारत सरकारने त्यांना सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणीही Bangladesh incident protest यावेळी करण्यात आली. यावेळी बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी अनेक धर्मप्रेमी, हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.