भंडारा,
Bhandara social welfare सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण भंडारा यांचे अधिनस्त भंडारा जिल्हयात कार्यरत मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह तसेच शासकीय निवासी शाळेत प्रवेशीत विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कला व क्रिडा महोत्सव दिनांक 27, 28 व 29 डिसेंबर, 2025 या कालावधीत अनुसूचीत जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा राजेदहेगाव येथे मोठया उत्साहात साजरे करण्यात आले.
दिनांक 27 डिसेंबर, 2025 रोजी सदर सांस्कृतिक कला व क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन श्रीमती आशा कवाडे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांचेहस्ते करण्यात आले.
सदर सांस्कृतिक कला व क्रिडा महोत्सवामध्ये जिल्हयातील 3 मुलांचे व 6 मुलींचे शासकीय वसतिगृहातील तसेच निवासी शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर 3 दिवसीय कार्यक्रमांतर्गत क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बुध्दीबळ, कॅरम, बॅडमिंटन इत्यादी खेळाचे आयोजन तसेच विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग घेत आपल्या सुप्त गुणांचे /कलांचे प्रदर्शन करत महोत्सवाचा आनंद घेतला.सदर कार्यक्रमाचे समारोप दिनांक 29 डिसेंबर, 2025 रोजी सावन कुमार, (भा.प्र.से) जिल्हाधिकारी, भंडारा यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. सदर कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून देवसूदन धारगावे, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, भंडारा, श्रीमती आशा कवाडे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,भंडारा, श्रीमती संध्या दहिवले, मुख्याध्यापिका, अनुसूचीत जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा, राजेदहेगाव हया उपस्थित होते.
सदर समारोपीय कार्यक्राचे सुरवातीस मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वल व शाहू, फुले, सावित्री बाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आले. तद्नंतर सदर सांस्कृतिक कला व क्रिडा महोत्सवामध्ये सहभागी होवून आपले कलांचे प्रदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांना ट्राफी व मेडल देवून सत्कार करण्यात आले.
सदर समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती आशा कवाडे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांस्कृतिक कला व क्रिडा महोत्सवामध्ये सहभागी विद्यार्थ्याचे कलेची स्तुती केली व त्यांना मार्गदर्शन केले.मा.जिल्हाधिकारी महोदयांनी आपले अध्यक्षिय भाषणामध्ये विद्यार्थ्यांचे कौतुक करत जीवनामध्ये खेळाचे किती महत्व आहे. खेळामुळेसुध्दा विद्यार्थ्यांना त्यांचे जीवनामध्ये ध्येय गाठत आपले,आपल्या शाळा/ वसतिगृहाचे, आपल्या कुटूंबाचे, व देशाचे गौरव साध्य करता येते. त्यामुळ सर्व विद्यार्थ्यांनी शालेय तसेच महाविद्यालयीन जिवनामध्ये खेळात सहभागी होणे गरजेचे आहे. असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण घेतांना काही अडचण किंवा मार्गदर्शनाची गरज वाटल्यास त्यांनी जिल्हाधिकारी, कार्यालयात येवून त्यांचेशी भेटू शकतात असे सांगितले.सदर कार्यक्रमाचे यशस्वीरित्या नियोजन करण्याकरीता योगराज सावरबांधे, गृहपाल शिवराम बारई, गृहपाल, सुनिल बैतुले, गृहपाल, प्रशांत वासनिक, स.क.नि, श्रीमती सारिका राऊत,स.शि श्रीमती रजंना गजाम, स.शि श्री.लोकेश शिवने, स.शि,मेश्राम, विजेश आडे, स.शि श्री.मनोज पिपरेवार, संगणक ऑपरेटर, व इतर सर्व वसतिगृहाचे गृहपाल/ कर्मचारी निवासी शाळेचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच क्रिस्टल कंपनीचे बाहयस्त्रोत कर्मचारी यांनी सहकार्य केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती सारिका राऊत, सहा.शिक्षिका व आभार प्रदर्शन श्री.योगराज सावरबांधे,गृहपाल यांनी केले.