२ मुलींसोबत मामाचे 'अनैतिक संबंध' मग भाच्याचे देखील 'पित्त उघड'

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
बिहार,
Nathnagar murder case बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील नाथनगर येथील मस्कन बरारी गावात एका भयंकर घटनेची उघडकीस आली आहे. सख्ख्या मामाने आपल्या भाच्याची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलाचे नाव अभिषेक असून, त्याचा मामा संतोष या प्रकरणात आरोपी आहे.

 Bihar crime news, Nathnagar murder case 
 
माहितीप्रमाणे, Nathnagar murder case  संतोष विवाहित असून त्याचे दोन मुलींसोबत अनैतिक संबंध होते. या दोघांपैकी एका मुलीचे अभिषेकशीही अनैतिक संबंध होते. अभिषेकला त्याच्या मामाच्या या प्रेमसंबंधांविषयी आधीच माहिती होती आणि त्याने या गोष्टीचा वापर करून मामाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मात्र संतोषने संतापून भाच्याचा काटा काढण्याचे ठरवले. स्वतः हात माखवता काम न करता, संतोषने काही गुंडांना अभिषेकची सुपारी दिली.या सुपारीनुसार चार गुंडांनी अभिषेकवर हल्ला केला. करवत, ब्लेड आणि चाकूचा वापर करून त्याची हत्या करण्यात आली. मृतदेह धडापासून वेगळा करून, रक्त दूरवर न पोहोचावे म्हणून त्यांनी मानेखाली आणि पायांमध्ये प्लास्टिक शीट ठेवली आणि घटनास्थळ सोडले.
 
 
अभिषेक घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांच्या तपासादरम्यान हत्येच्या मागे संतोष असल्याचे उघड झाले. या प्रकरणी संतोषला अटक करण्यात आली असून, त्यासोबत चार जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अभिषेकच्या कुटुंबीयांवर या घटनेमुळे अनंत दुःख कोसळले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणातून सामाजिक आणि कौटुंबिक नात्यांमधील गंभीर गुन्हेगारीच्या घटनांची खळबळजनक झलक दिसून येत आहे.