नागभीड,
chandrapur-bank-robbery तालुक्यातील मोहाळी मोकासा येथील ग्रामीण बँकेवर दरोडा टाकण्यात आला. यात 170 ग्रॅम सोने आणि 3 लाख 66 हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत. सोमवारी बँक उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. हा दरोडा शुक्रवार ते रविवार दरम्यान रात्री टाकण्यात आला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
chandrapur-bank-robbery बँकेचे शिपाई प्रभाकर शेंद्रे सोमवारी रजेवर असल्याने सहायक प्रबंधक करिष्मा धकाते यांनी बँकेचा दरवाजा उघडला आणि त्या आत गेल्या. स्ट्राँगरूमजवळ गेल्या असता त्यांना स्ट्राँगरूमची तोडफोड झाल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच बाहेर येऊन रजेवर असलेल्या शिपायास बोलावून घेतले. शाखा प्रबंधक शेख मोहसीन शेख यांनाही माहिती दिली. शाखा प्रबंधक शेख तातडीने बॅकेत पोहचले. परिस्थितीचे अवलोकन करून त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
chandrapur-bank-robbery माहिती मिळताच पोलिसांनीही तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला. लगेच न्यायवैद्यक चमूलाही पाचारण करण्यात आले. ही चमू घटनास्थळी पोहोचताच तपासाला गती आली. लवकरच डॉगस्कॉड पोहचत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, बँकेचे प्रबंधक शेख मोहसीन शेख मुस्तफा अगवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या लॉकरमध्ये असलेले 170 ग्रॅम सोने आणि 3 लाख 66 हजार रुपये बँकेतून चोरी गेले आहेत.