भाजपा व काँगे्रसच्या उमेदवारांची यादी अद्यापही गुलदस्त्यात!

chandrapur-cmc-bjp-congress दोन्ही पक्षाच्याशीर्षस्थ नेत्यांतील बेबनावाचा परिपाक

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
अर्ज भरण्याचा आज अंतीम दिवस
चंद्रपूर, 
 
chandrapur-cmc-bjp-congress महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख मंगळवार, 30 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजपेर्यंत आहे. अर्थात, शेवटचा दिवस अगदीच तोंडावर आहे. तरीही भाजपा व काँगे्रस या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची यादी अद्यापही गुलदस्त्यात आहे. या दोन्ही पक्षातील शीर्षस्थ नेत्यांमधील बेबनाव यास कारणीभूत ठरत असून, त्यामुळे ईच्छुक उमेदवारांचा श्‍वास टांगणीला लागला आहे.
 
 

chandrapur-cmc-bjp-congress 
 
 
chandrapur-cmc-bjp-congress स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तशा प्रमुख नेत्यांच्या नसतात, त्या कार्यकर्त्यांच्या असतात. मात्र, कार्यकर्ते नेत्यांच्या निवडणुकीसाठी राब राब राबतात. त्यांना निवडूण आणतात. त्यामुळे कार्यकर्त्यांची निवडणूक ही नेत्यांनीही तेवढ्याच गंभीरतेने हाताळावी ही सामान्य अपेक्षा असते. मात्र, भाजपा आणि काँगे्रसच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची निवडणूक कठीण करून ठेवल्याचे मत आता व्यक्त होत आहे. या नेत्यांच्या ‘इगो’मुळे उमेवारीचे निर्णय रखडले आहेत. प्रत्येक नेता आपल्या यादीवर ठाम आहे.
 
 
chandrapur-cmc-bjp-congress तर दुसरीकडे आपल्याला उमदेवारी मिळेल की नाही, याची कार्यकर्त्यालाही शाश्‍वती राहिलेली नाही. कारण भाजपा व काँगे्रस या दोन्ही पक्षांत प्रत्येकी दोन प्रबळ गट आणि अन्य लहान गट सक्रिय आहेत. या दोन्ही पक्षांच्या विविध गटांसह सोमवारपर्यंत झालेल्या सार्‍या बैठका निर्णयाअभावी स्थगित झाल्या आहेत. नेमकी काय स्थिती आहे कळायला मार्ग नाही. ईच्छुक उमदेवार व कार्यकर्ते आवासून बघत आहेत. पण काहीही झाले तरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या उमदेवारांच्या यादीवर सोमवारी रात्रीपर्यंत ठाम निर्णय घ्यावाच लागणार आहे. कारण मंगळवार हा उमदेवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे.
 
चौथ्या दिवशी 66 नामनिर्देशन पत्र दाखलchandrapur-cmc-bjp-congress
सोमवार, 29 डिसेंबर 2025 रोजी 66 नामनिर्देशन दाखल करण्यात आली आहेत. तसेच 300 नामनिर्देशन पत्रांची उचल झाली आहे. आजवर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची 5 कार्यालये मिळून एकूण 173 इच्छूकांनी 300 नामनिर्देशन पत्रांची उचल केली. नामनिर्देशन पत्रे ही केवळ प्रत्यक्षरित्याच (ऑफलाईन) सादर करता येत आहेत. मंगळवार, 30 डिसेंबर रोजी शेवटच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.
केंद्रनिहाय अर्जाची संख्या chandrapur-cmc-bjp-congress
निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 1-(प्रभाग क्रमांक 1, 2 व 5)-24 इच्छुकांद्वारे 37 अर्जांची उचल, 11 अर्ज दाखल. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 2-(प्रभाग क्रमांक 3, 4 व 6)-37 इच्छुकांद्वारे 59 अर्जांची उचल, 18 अर्ज दाखल. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 3-(प्रभाग क्रमांक 7, 8 व 9)-50 इच्छुकांद्वारे 97 अर्जांची उचल, 14 अर्ज दाखल. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 4-(प्रभाग क्रमाक 10, 11, 12 व 15)-40 इच्छुकांद्वारे 72 अर्जांची उचल, 18 अर्ज दाखल. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 5-(प्रभाग क्रमाक 13, 14, 16 व 17)- 22 इच्छुकांद्वारे 35 अर्जांची उचल, 5 अर्ज दाखल.