गोंदियात वर्षाचा शेवट ‘हुडहुडी’तच!

gondia-lowest temperature पारा ८.८ अंशावर; विदर्भात सर्वाधिक थंड

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
गोंदिया, 
 
gondia-lowest temperature जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ८ अंशावर पोहचलेले तापमान मागील काही दिवसात ९ अंशाच्या वर होते. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात सातत्याने घट होत असून सोमवारी ८.८ सेल्सिअस किमान तापमानाची नोंद घेण्यात आली. येत्या दिवसात थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज असल्याने जिल्हावासीयांना वर्षाचा शेवटही हुडहुडीतच साजरा करावा लागणार असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, मागील काही दिवसात विदर्भात गोंदियाचे तापमान सातत्याने थंड असल्याची असल्याची नोंद झाली आहे.
 
 
 
 
gondia-lowest temperature
 ( संग्रहित)
 
 
gondia-lowest temperature यंदा दिवाळी व दिवाळानंतरही थंडीचा पत्ता नव्हता. दरम्यान नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीची चाहूल लागली. त्यानंतर सातत्याने थंडीचा प्रकोप वाढत गेला. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्याचे सर्वाधिक कमी तापमान ८ सेल्सिअस दोनदा नोंदविले गेले. त्यानंतर थंडीने जिल्ह्यात बस्तानच मांडल्याचे दिसते. डिसेंबर महिन्यातही एकदा ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर तापमान १० अंशाच्या खाली गेले नाही. तर दिवसाचे तापमानही २६-२७ अंशाच्या वर नसल्याने दिवसाही थंडीपासून बचावाच्या उपायोजना करीत नागरिक बाहेर पडताना दिसत होते.
 
 
 
तर रात्रीला ठिकठिकाणी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटलेल्या पहायला मिळत होत्या. त्यातच मागील तीन-चार दिवसात तापमानात घट होत असून रविवारी ८ अंश सेल्सिअस, सोमवारी ८.८ अंश सेल्सिअस नोंद घेण्यात आली आहे. आगामी काही दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. अशात ‘थर्टी फस्ट‘ व ‘न्यू ईयर’ सेलेब्रेशन जिल्हावासींना थंडीच्या हुडहुडीतच साजरा करावा लागणार असल्याचे दिसत आहे.
 
 
थंडीमुळे आरोग्याच्या समस्या
दोन महिन्यांपासून जिल्ह्याचे तापमान विदर्भात सर्वाधिक कमी असल्याची नोंद झाली आहे. या कालावधीत तापमानात चढउतार होत असला तरी रात्रीची गारठणारी थंडी, सकाळचे धुकेमय वातावरण व दिवसाही थंडावाचा सामना जिल्हावासीयांना करावा लागत आहे. या थंडीचा परिणाम ज्येष्ठ नागरिक व लहान बालकांवर होत असून सर्दी, खोकला व तापाचे रूग्ण शासकीय व खासगी रूग्णालयात मोठ्या संख्येने पहायला मिळत आहे.