राजकारणाचे जोडे बाहेर काढून शहर विकास करू : आ. कुणावार

hinganghat-np-wardha नवनिर्वाचित नगराध्यक्ष नयना तुळसकर यांनी पदभार स्वीकारला

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
हिंगणघाट, 
 
 
hinganghat-np-wardha संपूर्ण शहराचा विकास करणे हेच आमचे ध्येय असून यासाठी शासनाकडून पाहिजे तेवढा निधी आणून देण्याची जबाबदारी आपली आहे. मात्र नप अधिकारी व कर्मचार्‍यांनी जबाबदारीचे भान राखत प्रशासन लोकाभिमुख ठेवल्यास विदर्भातील सर्वात सुशिक्षित नगराध्यक्ष असलेल्या नयना तुळसकर व चाळीस नगरसेवकांच्या विकास कामाला प्राधान्य द्या आणि महाराष्ट्रात हिंगणघाटला प्रथम स्थानावर नेण्याचा आमच्या प्रयत्नाला साथ द्या असे आवाहन आ. समीर कुणावार यांनी केले. आज सोमवार २९ रोजी सायंकाळी ४ वाजता नप प्रांगणात नवनिर्वाचित नगराध्यक्ष नयना तुळसकर व चाळीस नगरसेवक यांच्या पदग्रहण सोहळ्याजनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
 
 

hinganghat-np-wardha 
 
 
hinganghat-np-wardha यावेळी नगराध्यक्ष नयना तुळसकर, सिंदी रेल्वेच्या नगराध्यक्ष राणी कलोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, भाजपा नपचे गटनेते भूषण पिसे, नपचे माजी अध्यक्ष अ‍ॅड, मुरलीमनोहर व्यास, नितीन मडावी, रिपाईचे शंकर मुंजेवार, नप मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे उपस्थित होते. यावेळी आ. कुणावार यांनी सन २०१४ पासून शहर विकासासाठी त्यांनी शासनाकडून भांडून मागे लागून खेचून आणलेल्या विविध विकास कामाची माहिती दिली. ९ वर्षापूर्वी ज्याप्रमाणे ३० नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून दिले त्याचं प्रमाणे यंदाही विदर्भातून सर्वाधिक मताधियाने नगराध्यक्ष निवडून देऊन आमच्या विकास कामावर शिक्कामोर्तब केल्या बद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. यावेळी व्यासपीठावर बोलावून चाळीसही नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
 
 
 
hinganghat-np-wardha मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन प्रा अभय दांडेकर यांनी केले. विशाल ब्राह्मणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश धारकर, पीवी टेसचे भूपेंद्र शहाणे, वर्धा नागरी बँकेचे संचालक श्याम भीमनवार, डॉ. प्रकाश लाहोटी, डॉ. अशोक मुखी, आर. बी. मॅडमवार, अशोक रामटेके, गिमा टेसचे शाकीर खान पठाण, डॉ. उमेश तुळसकर व शहरातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहर भाजपा अध्यक्ष भूषण पिसे यांची भाजपाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली.  कार्यक्रमापूर्वी आ. कुणावार यांच्या निवासस्थानी पुरोहितांनी मंत्रोच्चारात आशीर्वचन दिले. त्यानंतर भगवे शेले घेऊन ढोल ताशे आणि फटायांच्या आतषबाजीत आ. कुणावार, नवनिर्वाचित नगराध्यक्ष तुळसकर, नवनिर्वाचित नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी आ. कुणावार यांच्या निवासस्थानाहून नगर पालिकेत पोहोचले.
 
विकासाचा दीर्घकालीक आराखडा : नगराध्यक्ष तुळसकर hinganghat-np-wardha
पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष नयना तुळसकर यांनी हिंगणघाट शहरातील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता नपसाठी दीर्घकालीन विकास आराखडा राबविण्याचा मानस व्यत केला. शहरात रोजगार संधी निर्माण करून २४ तास पिण्याच्या पाण्यासाठी बंधार्‍यांची निर्मिती, महिलांना सक्षम करणार्‍या योजना तसेच बीसीसी ग्राऊंडवर क्रीडा विकासाला प्राधान्य देण्याची व शैक्षणिक क्षेत्रात विशेष लक्ष देऊन शहराच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचा निर्धार व्यत केला.