पराग मगर
नागपूर,
Makar Sankranti उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरातील काही गाेष्टी अस्सल नागपुरी म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये तर्रीपाेहा, सांबारवडी, संत्रार्बी या वस्तू जशा प्रसिद्ध आहेत त्यात पुन्हा एका वस्तूचा क्रमांक लागताे ताे नागपुरी पतंग. संपूर्ण पांढèया तावावर लहानशा डिझाईन अशा प्रकाराने आपली वेगळी ओळख पतंगांच्या भाऊगर्दीत नागपुरी पतंगीने ठेवली असून अनेक वर्षांपासून सर्वाधिक पसंतीस उतरली आहे.
संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या दिवसांत महाराष्ट्रासह इतरही अनेक राज्यात माेठ्या प्रमाणात पतंग उडविली जाते. यात नागपूरही अग्रक्रमावर आहे. गेल्या काही दिवसांपासूनच जुनी शुक्रवारी परिसरात पतंग विक्रीची दुकाने सजली असून खरेदीसाठी पतंगप्रेमींची गर्दी वाढली आहे. पतंगां चे विविध प्रकार बाजारात विक्रीस असतात. शुक्रवारी मार्केटमधील विक्रेते साैरभ खाेरगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरात पंजाब, बरेली, काेलकाता येथूनही पतंग विक्रीस येतात. यामध्ये पंजाबी पतंगी या त्या राज्याप्रमाणेच विविधरंगी आणि भरपूर सजविलेल्या असतात. पतंग उडविताना दुसèयाची पतंग कापण्याचा खेळ नागपुरात माेठ्या प्रमाणात खेळला जाताे. यासाठी खास बरेली येथील पतंग उपयाेगात आणली जाते तसेच जयपूरच्या लहान आकाराच्या आणि काेलकात्याच्या खास काळ्या तावाच्या पतंगही वेगळी ओळख ठेवत असल्या, तरी संपूर्ण पांढèया तावावर आखेदार, खडासब्बल, टाेकदार, गाेलेदार, चांददार, भांगदार, डब्बेदार या पद्धतीची काळ्या तावातील चिन्हे असलेल्या नागपुरी पतंग आपली वेगळी ओळख ठेवतात. या पतंग नागपूरसह महाराष्ट्रात सर्वाधिक पसंतीस उतरत असल्याची माहिती साैरभ यांनी दिली.
स्थानिक कारागिरांना अच्छे दिन
या पतंग शहरातील टिमकी, पाचपावली, हसनबाग या परिसरात तयार केल्या जातात. यात माेठ्या प्रमाणात कारागीर गुंतले आहे. माेठ्या प्रमाणात या पतंगींची बाहेर निर्यात हाेत असल्याने स्थानिक कारागिरांना अच्छे दिन आले आहेत.
सुती धाग्याला पसंती
नायलाॅन मांजावर बंदी असून विक्रेत्यांवर कारवाई हाेत आहे. या बंदीचे समर्थन करणारे साैरभ खाेरगडे सांगतात आम्ही अनेक वर्षांपासून सुती धागाच विक्रीस उपलब्ध करताे तसेच लाेकांनीही हाच धागा विकत घ्यावा, असे आवाहनही ते करीत असतात.
250 रुपयांचा ढड्डा
पतंगांमध्ये विविध आकार असतात. यामध्ये साडेचाेवीस पासून 100 इंचापर्यंत पतंग तयार केल्या जातात. त्यातही नागपुरी पतंग सर्वात माेठ्या आकाराच्या असतात. सर्वांत माेठ्या पतंगीला नागपुरी बाेलीभाषेत ढड्डा म्हटले जाते. 250 रुपयांपर्यंत हा माेठा पतंग विकला जात असून या विशाल पतंग उडविणारेही पतंगप्रेमी असल्याचे खाेरगडे यांनी दिली.