मुंबई,
Snehal Jadhav राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, अनेक पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगताना पहायला मिळत आहे. मनसेला गेल्या काही दिवसांमध्ये धक्क्यावर धक्के बसत आहेत, काही दिवसांपूर्वीच मनसेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता, त्यानंतर आता मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोडांवर मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू होती, गेल्या आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केली, त्यानंतर मनसेला दुसरा मोठा धक्का बसला आहे.
पक्षाच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षातील सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
स्नेहल जाधव यांनी Snehal Jadhav वॉर्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी जाहीर करताना त्यांना पक्षाच्या निर्णयात विश्वासात न घेतल्याचे नाराजी व्यक्त केली. या निर्णयामुळे त्यांनी राजीनामा देत मनसेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्नेहल जाधव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत १९९२ ते २००७ या कालावधीत सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून वॉर्ड क्रमांक १९२ चे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर २००७ ते २०१२ या कालावधीत त्यांचे पती नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सलग तीन वेळा कुटुंबाने वॉर्ड क्रमांक १९२ मधून विजय मिळवला असूनही, मनसेकडून यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने स्नेहल जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.गेल्या काही दिवसांपासून मनसेसाठी धक्क्यांची मालिका सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून मनसेसाठी धक्का दिला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. या युतीनंतर पक्षातील काही नेते आणि इच्छुक उमेदवार नाराज आहेत.
स्नेहल जाधव
नाराजीचे सूर
राज्यात महापालिका Snehal Jadhav निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीचे राजकारण जोरात आहे. अनेक पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत असून, मनसेसारख्या पक्षालाही यंदा निवडणूक रणनितीत मोठा आव्हान आहे.मुंबईतील राजकीय तज्ज्ञांच्या मते, स्नेहल जाधव यांचा राजीनामा मनसेसाठी निर्णायक क्षणी धक्का ठरू शकतो. यंदाच्या निवडणुकीत पक्षाला संपूर्ण ताकद लागू करण्यासाठी आणि महापालिकांमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.