दाेन वर्षांत एक काेटीचा नायलाॅन मांजा जप्त

178 गुन्ह्यांत 279 जणांना अटक ,बंदी असतानाही बिनधास्त विक्री

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nylon manja ban, पतंगबाजीसाठी नागपूर शहराची ओळख असून अनेक पतंगबाज नायलाॅन मांजाचा वापर करण्याचा हट्ट धरतात. मात्र, नायलाॅन मांजामुळे पशू-पक्ष्यांसह मानवी जिवीतास धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे न्यायालय, पाेलिस, महापालिका आणि प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दाेन वर्षांत एक काेटी 25 हजार रुपयांचा नायलाॅन मांजा पाेलिसांनी जप्त केला असून 178 गुन्हे दाखल करीत तब्बल 279 जणांना अटक केली आहे.
 
 

nylon manja ban, 
पर्यावरणासह जिवितास nylon manja ban, हाेणारा धाेका लक्षात घेता नायलाॅन मांजावर शासनाने बंदी आणली आहे.तरीही शहरात छुप्या पद्धतीने नायलाॅन मांजा दाखल हाेत असल्याची माहिती आहे. नायलाॅन मांजा अत्यंत धारदार व न तुटणारा असल्याने दुचाकीस्वारांचे गळे कापले जाणे, पादचाèयांना गंभीर इजा, तसेच पक्षी व जनावरांचे मृत्यू हाेण्याच्या घटना दरवर्षी वाढत आहेत. त्यामुळे नायलाॅन मांज्याचा वापर व विक्री करणाèयांविराेधात न्यायालयासह प्रशासनाने कंबर कसली आहे. नायलाॅन मांजा विक्री करणाèया दुकानदारांवर अडीच लाखांचा दंड आणि नायलाॅन मांजाचा उपयाेग करुन पतंग उडविणाèयास 50 हजारांचा दंड करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. तसेच अल्पवयीन मुलगा जर नायलाॅन मांजाने पतंग उडवत असेल तर थेट त्याच्या पालकावर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. प्रतिबंधित असलेल्या नायलाॅन मांजा लपून-छपून शहरात आणल्या जात आहे.अनेक दुकानदारांनी पाेलिसांच्या कारवाईच्या भीतीने मुख्य शहराच्या बाहेर वाडी, हिंगणा, हुडकेश्वर, काेराडी, कामठी, एमआयडीसी या परिसरात साठवणूक केल्याची माहिती आहे. मानवी जीवन, पशुपक्षी आणि दुचाकीस्वारांसाठी अत्यंत धाेकादायक ठरणाèया या जीवघेण्या मांज्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 आणि 2025 या दाेन वर्षांत एकूण 178 गुन्हे दाखल करून 279 आराेपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान 1 काेटी 25 हजार रुपये किमतीचा नायलाॅन मांज्यासह साहित्य जप्त करण्यात आले आहे. 2024 मध्ये 122 गुन्हे दाखल हाेऊन 145 आराेपींना अटक करण्यात आली असून सुमारे 34 लाख 48 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर 2025 मध्ये 56 गुन्हे दाखल करून 60 आराेपींना अटक करण्यात आली असून 65 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
 
 
 
परराज्यातून नायलाॅन मांजा नागपुरात
परराज्यातून नायलाॅन मांजा नागपुरात येताे. त्यात मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश येथून नायलाॅन मांजा शहरात येताे. हा मांजा खासगी वाहनांतून धान्य किंवा अन्य स्वरुपाच्या मालांमध्ये लपून नागपुरात आणला जाताे. त्यानंतर शहराच्या बाहेर असलेल्या पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील गाेडाऊन आणि घरांमध्ये साठविल्या जाताे. तेथून लहान दुकानदारांना पुरविण्यात येताे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
 

 
 
जनजागृतीवर द्यावा लागेल भर
 
 
पाेलिसांनी शाळा, महाविद्यालयासह समाजात जाऊन जनजागृती करणे गरजेचे आहे. वरिष्ठांनी आदेश दिला म्हणून थातूरमातूर जनजागृती करणे किंवा कारवाई करणे हे टाळावे लागणार आहे. पाेलिसांनी पालक आणि युवा वर्गांशी थेट संवाद साधणे गरजेचे आहे. गुन्हे शाखेची पथके ‘पांढरा हत्ती’ न बनता प्रत्यक्षात कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच काही पाेलिस कर्मचाèयांचे नायलाॅन मांजा विक्रेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असतात, त्यातून हा मांजा शहरात पाेहचताे, अशी चर्चा आहे.
नायलाॅन मांजा विराेधात आतापर्यंत जनजागृती केली आहे. तसेच धड़ाकेबाज कारवाईसुद्धा केली आहे. दुकानदारांवर लाखाेंचा दंडासह विक्रेत्यासह ग्राहकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. दुकानासह पतंग उडविणाèयांकडेही नायलाॅन मांजा आढळल्या कायदेशिर कारवाई करण्यात येईल.