शेतातील झाडावर अस्वलीचे बस्तान

pombhurna-bear-farmer देवई येथील घटना

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
पोंभूर्णा, 
 
pombhurna-bear-farmer तालुक्यातील देवई येथील एका शेतात झाडावर अस्वलीने बस्तान मांडल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी सकाळच्या सुमारास त्या अस्वलीला हूसकावून लावण्यात वनविभागाला यश आले. पोंभुर्णा तालुक्यातील देवई येथील रामचंद्र इष्टाम यांच्या सर्व्हे क्रमांक 256 मधील 1 हेक्टर शेतात कापूस व तुरीची लागवड करण्यात आली आहे. pombhurna-bear-farmer मात्र, शेतातील आंजनाच्या झाडावर शनिवारी अस्वलीने बस्तान मांडले. कापूस तोडणीसाठी शेतात गेलेल्या मजुरांना अस्वल दिसताच त्यांनी तत्काळ माघार घेतली. ही बाब लक्षात येताच शेतकर्‍याने गावकरी व वनविभागाला सूचना केली.
 
 
 
 
pombhurna-bear-farmer
(झाडावर बसलेली अस्वल)
 
 
pombhurna-bear-farmer अस्वलीला हुसकावून लावण्यासाठी वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी दिवसभर शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर अस्वल आंजनाचे झाड सोडून बाभळीच्या झाडावर चढले. यादरम्यान तिने उपस्थित गावकरी व वनविभागाच्या कर्मचार्‍यावर हल्ला चढविण्याचाही प्रयत्न केला होता. सायंकाळपर्यंत अस्वलीला खाली उतरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तिने जागा सोडली नाही. शनिवारी रात्रभर ती शेतातच बस्तान मांडून होती. pombhurna-bear-farmer दरम्यान, रविवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचार्‍यांना अस्वलीला हुसकावून लावण्यात यश आले. अस्वलीच्या वावर असल्यामुळे शेतातील कापूस व तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, वनविभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी रामचंद्र इष्टाम यांनी केली आहे.
 
 
 
pombhurna-bear-farmer सध्या शेतात कापूस व तुरीचे पीक उभे असतानाच अस्वल शेतात प्रवेश करीत असल्यान शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी अस्वल शेतशिवारात मुक्तसंचार करीत असल्याने शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भीतीपोटी शेतकरी शेतात जाण्यास धजावत नसून, कापूस वेचणीसह अन्य शेती कामे खोळंबली आहे.