डिजिटल ट्विनद्वारे भविष्य घडविण्याचा संकल्प

रामदेवबाबा विद्यापीठात एसीएम इंडिया विंटर स्कूल २०२५

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Ramdeobaba University Nagpur रामदेवबाबा विद्यापीठ, नागपूर येथे एसीएम इंडिया कौन्सिल व एसीएम नागपूर प्रोफेशनल चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने 'एसीएम इंडिया विंटर स्कूल २०२५' चे यशस्वी आयोजन करण्यात आले. “डिजिटल ट्विन्सच्या मदतीने भविष्याची निर्मिती” या विषयावर आधारित हा दहा दिवसांचा शैक्षणिक उपक्रम दिनांक १५ ते २४ डिसेंबर या कालावधीत पार पडला.
 
 
 Ramdeobaba University Nagpur
या उपक्रमाला व्हीएनआयटी नागपूर यांचे शैक्षणिक सहकार्य, टीसीएस रिसर्च यांचे ज्ञानसहकार्य तर पर्सिस्टंट सिस्टिम्स यांची स्थानिक उद्योग भागीदार म्हणून साथ लाभली. विंटर स्कूलचे उद्घाटन व समारोप शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांच्या उपस्थितीत Ramdeobaba University Nagpur झाले. यामध्ये डॉ. एस. एस. मंथा, डॉ. राजेश पांडे, डॉ. एम. बी. चांडक, डॉ. उमेश देशपांडे, डॉ. प्रीती वोडिटेल यांच्यासह इतरांचा समावेश होता. या दहा दिवसांच्या कार्यक्रमात डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाची मूलतत्त्वे, जटिल प्रणालींमधील निर्णय-निर्माण प्रक्रिया, मॉडेलिंग आणि सिम्युलेशन यावर सखोल मार्गदर्शन देण्यात आले. तज्ज्ञ प्राध्यापक व उद्योगातील अनुभवी तज्ञांनी व्याख्याने तसेच प्रात्यक्षिक सत्रांच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव दिला. याशिवाय पर्सिस्टंट सिस्टिम्स येथे आयोजित उद्योग भेटीतून विद्यार्थ्यांना डिजिटल ट्विनचे औद्योगिक उपयोग, संशोधन व प्रत्यक्ष अंमलबजावणी यांची सखोल माहिती मिळाली. या अनुभवामुळे शैक्षणिक ज्ञान आणि उद्योगातील गरजा यातील दरी कमी करण्यास मदत झाली. एसीएम इंडिया विंटर स्कूलच्या यशस्वी आयोजनामुळे रामदेवबाबा विद्यापीठाची प्रगत तांत्रिक शिक्षण, संशोधन आणि उद्योगाभिमुख उपक्रमांप्रतीची ठाम बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.