साजिद खानचा अपघात, थोडक्यात वाचले?

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
मुंबई,
sajid khan प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक आणि ‘बिग बॉस’मधील माजी स्पर्धक साजिद खानला शनिवारी चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे. अपघातात साजिदचा पाय फ्रॅक्चर झाला असून, दुसऱ्या दिवशी तातडीने त्याला रूग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, जी यशस्वी ठरली आहे. साजिदच्या प्रकृतीबाबत माहिती त्यांच्या बहीण फराह खानने दिली.
 

sajid khan 
फराह खानने सांगितले, “रविवारी साजिदवर शस्त्रक्रिया पार पडली. ही सर्जरी यशस्वी झाली. त्याची प्रकृती आता ठीक आहे. काळजी करण्यासारखे आता कारण नाही. तो बरा होत आहे.” अपघाताच्या वेळी साजिद एकता कपूरच्या प्रॉडक्शनसाठी शूटिंग करत होता.
 
 
साजिद खान sajid khan दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा दिग्दर्शनात परतत आहेत. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘हमशकल्स’ 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2005 साली अमिताभ बच्चन आणि अर्जुन रामपाल अभिनीत ‘डरना मना है’ या हॉरर चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. 2007 मध्ये आलेल्या कॉमेडी चित्रपट ‘बेबी’मुळे त्यांना खरी ओळख मिळाली, त्यानंतर ‘हाऊसफूल’ आणि ‘हाऊसफूल 2’सारखे चित्रपटही यशस्वी ठरले.साजिद खान अनेक कारणांमुळे सतत चर्चेत राहतात. 2022 मध्ये ते ‘बिग बॉस’मध्ये दिसले होते. काही वर्षांपूर्वी #MeToo आंदोलनाच्या काळात त्यांच्यावर काही तरूणींनी आरोप केले होते. सध्या त्यांच्या बहीण फराह खानही यूट्यूब चॅनेलमुळे चर्चेत आहे. तिने स्वयंपाकाचे व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे, तसेच काही सेलिब्रिटींच्या घरी जाऊन स्वयंपाक करताना व्हिडिओ बनवते. फराहसोबत तिचा कूक दिलीपही लोकप्रिय झाला असून, त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत.साजिद खानची प्रकृती आता स्थिर असून, चाहत्यांना त्यांच्या जलद बरे होण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या अपघातानंतर आणि शस्त्रक्रियेनंतर या बातमीने चित्रपटसृष्टीतील अनेकांना शंका आणि चिंता दूर केली आहे.