"‘शरद पवार माझे मार्गदर्शक आणि गुरु’; अदानींच्या विधानाने वेधले देशाचे लक्ष

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
बारामती,  
sharad-pawar-gautam-adani बारामतीत रविवारी (दि. 28) विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलेन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे उद्घाटन अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि अदानी फाउंडेशनच्या प्रमुख प्रीती अदानी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गौतम अदानी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “माझे मेंटॉर” असे म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला. भाषण सुरू होताच सभागृहात प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.

sharad-pawar-gautam-adani 
 
बारामतीत एकाच व्यासपीठावर शरद पवार आणि गौतम अदानी यांचा समवेश देशाच्या लक्ष वेधून घेत होता. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अदानी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध, अजित पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतल्याचे, तसेच इंडिया आघाडीतील शरद पवार यांचा सहभाग यामुळे उत्सुकतेला उभारी मिळाली होती. अदानी यांनी अर्ध्या तासाच्या भाषणात पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध पैलू उलगडले. त्यांनी देशाच्या राजकीय, कृषी, सहकार आणि ग्रामीण अर्थकारणात पवार यांचे योगदान अधोरेखित केले. sharad-pawar-gautam-adani अदानी म्हणाले, “जगात काही ठिकाणे अशी असतात जिथे एक बिंदू नसतो, परंतु ती ठिकाणे प्रगती, परिवर्तन आणि अशक्य वाटणाऱ्या कामाला प्रत्यक्षात उतरविण्याची जागा म्हणून ओळखली जातात. बारामतीही त्यापैकी एक आहे. परिवर्तनाचे प्रतीक म्हणून बारामतीकडे पाहिले जाते.”
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत झालेले काम हे केवळ स्थानिक विकासापुरते मर्यादित नसून शेतीत सुधारणा, सहकाराची उभारणी, उद्योजकतेला चालना, शैक्षणिक संस्था निर्माण आणि उद्योग धोरणांची रचना यामध्ये देखील प्रभावी ठरले आहे, असे अदानी यांनी सांगितले. त्यांनी शरद पवार यांच्या कृषी धोरण, अन्नसुरक्षा कायदा, सहकारी संस्थांचा विकास आणि ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. sharad-pawar-gautam-adani अदानी म्हणाले की, “परिवर्तन आणि स्थिरता या दोन्ही गोष्टींची देशाला गरज असताना शरद पवार खंबीरपणे उभे राहिले. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा पक्षीय स्तरावर काम करताना राष्ट्रीय हिताचे धोरण राबविणारा नेता क्वचितच दिसतो. शेतकरी जेव्हा सुखी असतो, तेव्हाच बाजारपेठ स्थिर राहते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.” खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, पवार आणि अदानी कुटुंब यांच्यातील प्रेमाचे नाते ३० वर्षांपासून टिकून आहे. “माझ्यासाठी गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नीचे मोठ्या भावाचे व वहिनीचे नाते आहे. चांगली-बाईट प्रत्येक गोष्ट मी हक्काने सांगते, तेही हक्काने रागावतात आणि त्यात जीव लावतात. त्यांच्या संघर्षाचे आम्ही जवळून निरीक्षण केले आहे. या यशात त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा आहे,” असे सुळे यांनी नमूद केले.