माओवाद्यांना लपण्यासाठी जागा नाही

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
 अग्रलेख 
 
 
maoists ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या भीषण चकमकीत ओडिशा राज्य समितीचा प्रभारी केंद्रीय समितीचा सदस्य आणि कोट्यवधी रुपयांचे बक्षीस असलेला क्रूरकर्मा माओवादी नेता गणेश उईकेचा खात्मा करण्यात आला. मागील काही महिन्यांपासून माओवादाच्या विरोधात राबवल्या जाणाèया कठोर कारवाईमुळे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातून माओवादी चळवळीचे पाय उखडले आहेत. त्यांना लपण्यासाठी कोणतीही जागा आता शिल्लक राहिलेली नसल्याचे सुरक्षा दलांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले. पूर्वी सुरक्षा दलांचा दबाव वाढल्यावर माओवादी ‘रेस्ट झोन’मध्ये जायचे. मात्र, अलिकडच्या काळात केंद्र आणि राज्यांनी राबवलेल्या ठोस आणि समन्वयित धोरणांमुळे माओवादी देशाच्या कोणत्याही भागात सुरक्षित राहिलेले नाहीत, हे स्पष्टपणे दिसून येते. सुरक्षा दलांची वाढलेली कार्यक्षमता, तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा अत्यंत निर्णायक ठरली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल, त्यांचे कोब्रा हे कमांडो युनिट, राज्य पोलिस दल आणि विशेष पथकांमध्ये समन्वय वाढवण्यात आला आहे. ड्रोन, उपग्रह छायाचित्रे, इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स आणि अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे माओवादी तळांवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे पूर्वी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जंगलांमध्येही माओवादी टिकू शकत नाहीत.
 

माओवादी  
 
 
माओवाद प्रभावित भागांमध्ये विकासाला गती देण्यात आली आहे. रस्ते, मोबाईल नेटवर्क, वीज, आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे स्थानिक आदिवासी व ग्रामीण जनता माओवादी विचारसरणीपासून दूर जात आहे. लोकांचा पाठिंबा कमी होत असल्याने माओवादी संघटनांची मुळेच कमजोर झाली आहेत. लोकशाही मार्गाने हा प्रश्न सुटू शकतो, यावर जनतेचा विश्वास वाढत आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरणागती आणि पुनर्वसन धोरणही अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. सरकारने माओवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आकर्षक शरणागती योजना राबवल्या आहेत. अनेक कडव्या माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजात परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघटनांतील मनोबल खचले असून, नेतृत्वावरही ताण वाढला आहे. या वाढलेल्या ताणामुळे नेतृत्व बरेचदा चुकीचे निर्णय घेते. याशिवाय माओवाद्यांच्या शहरी नेटवर्कवरही मोठा आघात करण्यात आला आहे. ‘अर्बन नक्षल’ जाळे, आर्थिक स्रोत, बौद्धिक पाठबळ आणि दळणवळण यंत्रणा उघडकीस आणून त्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्यामुळे माओवादी चळवळीला मिळणारा अप्रत्यक्ष आधारही मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. आजची परिस्थिती पाहता माओवादी संघटना केवळ काही भागांपुरत्या आणि संरक्षणात्मक भूमिकेत अडकल्या आहेत. सततच्या कारवायांमुळे ते स्थलांतरित होत आहेत, विखुरले जात आहेत आणि त्यांच्या हालचालींवर कडक नजर ठेवली जात आहे. एकंदरीत मजबूत राजकीय इच्छाशक्ती, प्रभावी सुरक्षा धोरण, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि जनतेचा वाढता सहभाग यामुळे माओवादाची पकड सैल झाली आहे. केंद्र आणि राज्यांच्या कठोर धोरणामुळे माओवाद्यांची हालचाल अतिशय मर्यादित झाली आहे. परिणामी, त्यांच्या तथाकथित ‘क्रांती’च्या दाव्यांवर स्वत:च्याच कॅडरचा विश्वास उरलेला नाही. पूर्वी जंगल, दुर्गम भाग आणि आदिवासी वस्त्यांमध्ये माओवाद्यांचा प्रभाव होता. मात्र, सातत्याने होणाèया चकमकी, अटक सत्रे, शरणागती योजना आणि वरिष्ठ नेत्यांचा खात्मा यामुळे संघटनेची नेतृत्व रचना कमकुवत झाली आहे. अनेक कॅडर स्वत:च्या सुरक्षिततेबाबत साशंक झाले असून, नेतृत्व त्यांना योग्य संरक्षण देऊ शकत नाही, ही भावना बळावली आहे. सुरक्षा दलांच्या वाढत्या कारवायांमुळे आर्थिक स्रोतांवरही मोठा आघात झाला आहे. विकासकामे, रस्ते, दळणवळण आणि कल्याणकारी योजनांमुळे स्थानिक जनतेचा सरकारवरील विश्वास वाढत असून, माओवाद्यांना मिळणारा पाठिंबा घटत आहे. प्रभावी सुरक्षा कारवाया आणि समांतर विकास धोरणांमुळे माओवादी चळवळीचा पाया हादरला आहे. नेतृत्वावरचा विश्वास खचल्याने आणि भविष्याबाबत अनिश्चितता वाढल्याने या चळवळीचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
माओवादी कॅडरचा नेतृत्वावरील विश्वास खचण्यामागे नेतृत्वच कारणीभूत आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणांना कंटाळून मोठ्या प्रमाणात माओवादी या चळवळीतून बाहेर पडले आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाले. कधीकाळी माओवादी हे आदिवासींचे आदर्श होते. त्यांनी आदिवासी समाजातील काही वाईट रूढी-परंपरा बंद केल्या होत्या. मात्र, साधारण 2000 पासून माओवादी चळवळ अतिशय हिंसक होत गेली. केवळ संशयावरून आदिवासी आणि दलितांचे माओवाद्यांनी गळे चिरले. शिक्षण घेणाèया तरुणांची नृशंस हत्या केली. त्यामुळे त्यांनी आदिवासी समाजाचा विश्वास गमावला. आदिवासी बांधव केवळ जीव वाचवण्यासाठी त्यांना मदत करायचे हे आता सिद्ध होत आहे. माओवादी नेत्यांनी केलेली दुसरी मोठी चूक म्हणजे, माओवादी चळवळ ही कॅडर-केंद्रित रचनेवर उभी होती. मागील काही काळात कॅडरवर लादण्यात आलेली अतिशय कठोर लष्करी सक्ती, वाढता दबाव, अंतर्गत दहशत आणि मानवी मूल्यांचा èहास यामुळे ही चळवळ हळूहळू विखुरली जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. माओवादी संघटनेत कॅडरला केवळ कार्यकर्ता न मानता ‘क्रांतीचा सैनिक’ म्हणून घडवले जाते. आदिवासी आणि दुर्गम भागांतील तरुणांना भरती करून त्यांना विचारधारात्मक शिक्षण, लष्करी प्रशिक्षण आणि कठोर शिस्त लावली जाते. सुरुवातीला शोषणाविरुद्ध लढा, जल-जंगल-जमीन यांचे रक्षण अशी खोटी उद्दिष्टे सांगितली जातात. मात्र, संघटनेत खोलवर गेल्यावर कॅडरला वैचारिक प्रेरणेपेक्षा लष्करी आज्ञापालनालाच अधिक महत्त्व दिले जाते. माओवादी चळवळीत कॅडरवरील लष्करी सक्ती ही बहुआयामी आहे. वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश न पाळल्यास शिक्षा, न्यायालयविना फाशी, मारहाण किंवा बहिष्कार यासारखी अमानवी दंडप्रणाली वापरली जाते. अनुभव नसलेल्या कॅडरला थेट सुरक्षादलांविरोधात घातपाती कारवायांमध्ये ढकलले जाते. संघटना सोडण्याचा विचार करणेही गद्दारी मानली जाते. परिणामी कॅडर मानसिक गुलामगिरीत अडकतो. माओवादी चळवळ आदिवासींच्या हक्कांची भाषा करते; परंतु प्रत्यक्षात सर्वाधिक शोषण आदिवासी कॅडरचेच होते. जंगलात सतत होणारे स्थलांतर, अपुरा आहार, औषधोपचारांचा अभाव, जखमी अवस्थेतही लढाईस भाग पाडणे, हे सर्व कॅडरच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनते. वरच्या फळीतील नेते तुलनेने सुरक्षित ठिकाणी राहत असताना, कनिष्ठ कॅडर मात्र थेट मृत्यूच्या दारात उभे राहतात. या दुहेरी धोरणामुळे संघटनेवरील विश्वास ढासळला आहे. सुरक्षा दलांनी माओवादी प्रभावक्षेत्रात सातत्यपूर्ण आणि अचूक कारवाया केल्यामुळे संघटनेवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. या दबावातून बाहेर पडण्यासाठी नेतृत्व कॅडरवर अधिकाधिक लष्करी सक्ती लादत आहे. दीर्घ पल्ल्याचे मार्च, वारंवार घातपात, मोठ्या प्रमाणावर आयईडी वापरणे यामुळे कॅडरचा थकवा वाढतो. परिणामी संघटनेतील शिस्त भीतीकडे वळते आणि भीती दीर्घकाळ टिकू शकत नाही. कॅडरवरील लष्करी सक्तीमुळे माओवादी चळवळीचा वैचारिक ऱ्हास झाला आहे. ‘जनतेसाठी लढा’ या घोषणेऐवजी ‘जिवंत राहण्यासाठी लढा’ ही भावना कॅडरमध्ये रुजत आहे. आपण खरोखरच जनतेसाठी लढतो आहोत का, हिंसेचा मार्ग आदिवासी विकासाला मदत करतो का, नेतृत्व स्वत: सुरक्षित राहून आम्हाला बळी देत आहे का, या उद्भवणाऱ्या प्रश्नांमुळे संघटनेत फूट पडू लागली आहे. महिला कॅडर माओवादी चळवळीचा महत्त्वाचा घटक मानल्या जातात. मात्र, त्यांच्यावर दुहेरी अन्याय होतो. एकीकडे लष्करी सक्ती, तर दुसरीकडे भावनिक, सामाजिक आणि कधी-कधी लैंगिक शोषण होते. यामुळे अनेक महिला कॅडर भावनिकदृष्ट्या कोलमडतात आणि संघटनेपासून दुरावतात. कॅडरवरील अमानवी लष्करी सक्तीचा थेट परिणाम म्हणजे आत्मसमर्पणाकडे कल वाढला आहे. कॅडरवरील वाढती लष्करी सक्ती ही माओवादी चळवळीच्या विघटनाचे प्रमुख कारण ठरली आहे. विचारधारेऐवजी हिंसा, लोकसमर्थनाऐवजी भीती आणि संघर्षाऐवजी अंतर्गत दडपशाही यामुळे चळवळीचा फोलपणा समोसुधारित अग्रलेख

माओवाद्यांना पळता भुई थोडी...
ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या भीषण चकमकीत ओडिशा राज्य समितीचा प्रभारी केंद्रीय समितीचा सदस्य आणि कोट्यवधी रुपयांचे बक्षीस असलेला क्रूरकर्मा- माओवादी नेता गणेश उईकेचा खात्मा करण्यात आला. मागील काही महिन्यांपासून माओवादाच्या विरोधात राबवल्या जाणाऱ्या कठोर कारवाईमुळे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातून माओवादी चळवळीचे पाय उखडले आहेत. त्यांना लपण्यासाठी कोणतीही जागा आता शिल्लक राहिलेली नसल्याचे सुरक्षा दलांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. पूर्वी सुरक्षा दलांचा दबाव वाढल्यावर माओवादी ‘रेस्ट झोन’मध्ये जायचे. मात्र, अलिकडच्या काळात केंद्र आणि राज्यांनी राबवलेल्या ठोस आणि समन्वयित धोरणांमुळे माओवादी देशाच्या कोणत्याही भागात सुरक्षित राहिलेले नाहीत, हे स्पष्टपणे दिसून येते. सुरक्षा दलांची वाढलेली कार्यक्षमता, तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा अत्यंत निर्णायक ठरली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल, त्यांचे कोब्रा हे कमांडो युनिट, राज्य पोलिस दल आणि विशेष पथकांमध्ये समन्वय वाढवण्यात आला आहे. ड्रोन, उपग्रह छायाचित्रे, इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स आणि अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे माओवादी तळांवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे पूर्वी सुरक्षित मानल्या जाणाèया जंगलांमध्येही आता माओवादी टिकू शकत नाहीत.
माओवाद प्रभावित भागांमध्ये विकासाला गती देण्यात आली आहे. रस्ते, मोबाईल नेटवर्क, वीज, आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे स्थानिक आदिवासी व ग्रामीण जनता माओवादी विचारसरणीपासून दूर जात आहे. लोकांचा पाठिंबा कमी होत असल्याने माओवादी संघटनांची मुळेच कमजोर झाली आहेत. लोकशाही मार्गाने आपले प्रश्न सुटू शकतात, यावर जनतेचा विश्वास वाढत आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरणागती आणि पुनर्वसन धोरणही अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. सरकारने माओवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आकर्षक आत्मसमर्पण योजना राबवल्या आहेत. अनेक कडव्या माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजात परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघटनांतील मनोबल खचले असून, नेतृत्वावरही ताण वाढला आहे. या वाढलेल्या ताणामुळे नेतृत्व बरेचदा चुकीचे निर्णय घेतले जातात. याशिवाय माओवाद्यांच्या शहरी नेटवर्कवरही मोठा आघात करण्यात आला आहे. ‘अर्बन नक्षल’ जाळे, आर्थिक स्रोत, बौद्धिक पाठबळ आणि दळणवळण यंत्रणा उघडकीस आणून त्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्यामुळे माओवादी चळवळीला मिळणारा अप्रत्यक्ष आधारही मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. आजची परिस्थिती पाहता माओवादी संघटना केवळ काही भागांपुरत्या आणि बचावात्मक भूमिकेत अडकल्या आहेत. सततच्या कारवायांमुळे नक्षलवादी स्थलांतरित होत आहेत, विखुरले जात आहेत आणि त्यांच्या हालचालींवर कडक नजर ठेवली जात आहे. एकंदरीत मजबूत राजकीय इच्छाशक्ती, प्रभावी सुरक्षा धोरण, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि जनतेचा वाढता सहभाग यामुळे माओवादाची पकड सैल झाली आहे. केंद्र आणि राज्यांच्या कठोर धोरणामुळे माओवाद्यांची हालचाल अतिशय मर्यादित झाली आहे. परिणामी, त्यांच्या तथाकथित ‘क्रांती’च्या दाव्यांवर त्यांच्याच कॅडरचा विश्वास उरलेला नाही. पूर्वी जंगल, दुर्गम भाग आणि आदिवासी वस्त्यांमध्ये माओवाद्यांचा प्रभाव होता. मात्र, सातत्याने होणाèया चकमकी, अटक सत्रे, शरणागती योजना आणि वरिष्ठ नेत्यांचा खात्मा यामुळे संघटनेची नेतृत्वरचना कमकुवत झाली आहे. अनेक कॅडर सदस्य स्वत:च्या सुरक्षिततेबाबत साशंक झाले असून, नेतृत्व त्यांना योग्य संरक्षण देऊ शकत नाही, ही भावना बळावली आहे. सुरक्षा दलांच्या वाढत्या कारवायांमुळे आर्थिक स्रोतांवरही मोठा आघात झाला आहे. विकासकामे, रस्ते, दळणवळण आणि कल्याणकारी योजनांमुळे स्थानिक जनतेचा सरकारवरील विश्वास वाढत असून, माओवाद्यांना मिळणारा पाठिंबा घटत आहे. प्रभावी सुरक्षा कारवाया आणि समांतर विकास धोरणांमुळे माओवादी चळवळीचा पाया हादरला आहे. नेतृत्वावरचा विश्वास खचल्याने आणि भविष्याबाबत अनिश्चितता वाढल्याने या चळवळीचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
माओवादी कॅडरचा नेतृत्वावरील विश्वास खचण्यामागे नेतृत्वच कारणीभूत आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणांना कंटाळून मोठ्या प्रमाणात माओवादी या चळवळीतून बाहेर पडले आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाले. कधीकाळी माओवादी हे आदिवासींचे आदर्श आणि आधार समजले जात होते. त्यांनी आदिवासी समाजातील काही वाईट रूढी-परंपरा बंद केल्या होत्या. मात्र, साधारण 2000 पासून माओवादी चळवळ अतिशय हिंसक होत गेली. केवळ संशयावरून आदिवासी आणि दलितांचे माओवाद्यांनी गळे चिरले. शिक्षण घेणाऱ्या तरुणांची नृशंस हत्या केली. त्यामुळे त्यांनी आदिवासी समाजाचा विश्वास गमावला. आदिवासी बांधव केवळ जीव वाचवण्यासाठी त्यांना मदत करायचे हे आता सिद्ध होत आहे. माओवादी नेत्यांनी केलेली दुसरी मोठी चूक म्हणजे, माओवादी चळवळ ही कॅडर-केंद्रित रचनेवर उभी होती. मागील काही काळात कॅडरवर लादण्यात आलेली अतिशय कठोर लष्करी सक्ती, वाढता दबाव, अंतर्गत दहशत आणि मानवी मूल्यांचा ऱ्हास यामुळे ही चळवळ हळूहळू विखुरली जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. माओवादी संघटनेत कॅडरला केवळ कार्यकर्ता न मानता ‘क्रांतीचा सैनिक’ म्हणून घडवले जाते. आदिवासी आणि दुर्गम भागांतील तरुणांना भरती करून त्यांना विचारधारेचे शिक्षण, लष्करी प्रशिक्षण आणि कठोर शिस्त लावली जाते. सुरुवातीला शोषणाविरुद्ध लढा, जल-जंगल-जमीन यांचे रक्षण अशी खोटी उद्दिष्टे सांगितली जातात. मात्र, संघटनेत खोलवर गेल्यावर कॅडरला वैचारिक प्रेरणेपेक्षा लष्करी आज्ञापालनालाच अधिक महत्त्व दिले जाते. माओवादी चळवळीत कॅडरवरील लष्करी सक्ती ही बहुआयामी आहे. वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश न पाळल्यास शिक्षा, विचाराविना फाशी, मारहाण किंवा बहिष्कार यासारखी अमानवी दंडप्रणाली वापरली जाते. अनुभव नसलेल्या कॅडरला थेट सुरक्षादलांविरोधात घातपाती कारवायांमध्ये ढकलले जाते. संघटना सोडण्याचा विचार करणेही गद्दारी मानली जाते. परिणामी कॅडर मानसिक गुलामगिरीत अडकतो. माओवादी चळवळ आदिवासींच्या हक्कांची भाषा करते; परंतु प्रत्यक्षात सर्वाधिक शोषण आदिवासी कॅडरचेच होते. जंगलात सतत होणारे स्थलांतर, अपुरा आहार, औषधोपचारांचा अभाव, जखमी अवस्थेतही लढाईस भाग पाडणे, हे सर्व कॅडरच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनते. वरच्या फळीतील नेते तुलनेने सुरक्षित ठिकाणी राहत असताना, कनिष्ठ कॅडर मात्र थेट सतत मृत्यूच्या दारात उभे राहतात. या दुटप्पी धोरणामुळे संघटनेवरील विश्वास ढासळला आहे. सुरक्षा दलांनी माओवादी प्रभावक्षेत्रात सातत्यपूर्ण आणि अचूक कारवाया केल्यामुळे संघटनेवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. या दबावातून बाहेर पडण्यासाठी नेतृत्व कॅडरवर अधिकाधिक लष्करी सक्ती लादत आहे. दीर्घ पल्ल्यांचे मार्च, वारंवार घातपात, मोठ्या प्रमाणावर आयईडी वापरणे यामुळे कॅडरचा थकवा वाढतो. परिणामी संघटनेतील शिस्त भीतीकडे वळते आणि भीती दीर्घकाळ टिकू शकत नाही. कॅडरवरील लष्करी सक्तीमुळे माओवादी चळवळीचा वैचारिक ऱ्हास झाला आहे. ‘जनतेसाठी लढा’ या घोषणेऐवजी ‘जिवंत राहण्यासाठी लढा’ ही भावना कॅडरमध्ये रुजत आहे. आपण खरोखरच जनतेसाठी लढतो आहोत का, हिंसेचा मार्ग आदिवासी विकासाला मदत करतो का, नेतृत्व स्वत: सुरक्षित राहून आम्हाला बळी देत आहे का, या उद्भवणाऱ्या प्रश्नांमुळे संघटनेत फूट पडू लागली आहे. महिला कॅडर माओवादी चळवळीचा महत्त्वाचा घटक मानल्या जातात. त्यांच्यावर दुहेरी अन्याय होतो. एकीकडे लष्करी सक्ती, तर दुसरीकडे भावनिक, सामाजिक आणि कधी कधी लैंगिक शोषण होते. यामुळे अनेक महिला कॅडर भावनिकदृष्ट्या कोलमडतात आणि संघटनेपासून दुरावतात. कॅडरवरील अमानवी लष्करी सक्तीचा थेट परिणाम म्हणजे आत्मसमर्पणाकडे कल वाढला आहे. कॅडरवरील वाढती लष्करी सक्ती ही माओवादी चळवळीच्या विघटनाचे प्रमुख कारण ठरली आहे. विचारधारेऐवजी हिंसा, लोकसमर्थनाऐवजी भीती आणि संघर्षाऐवजी अंतर्गत दडपशाही यामुळे चळवळीचा फोलपणा समोर आला. आता त्यांचा एकेक मोहरा टिपला जात असल्याने त्यांना पळता भुई थोडी झाली आहे.र आला. लष्करी दडपशाहीमुळे कोणतीही चळवळ यशस्वी होत नाही, हे माओवादी चळवळीचे कटु वास्तव आहे.