वर्धा नागरी बँकेच्या दिनदर्शिकेचे विमोचन

wardha-cooperative-bank सामान्य नागरिकांसाठी सोयीस्कर

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
 
wardha-cooperative-bank वर्धा जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील अग्रणी बँक व नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंदपूरसह पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या तसेच नागपूर, अमरावती, यवतमाळसह १६ शाखेसह कार्यरत असलेल्या वर्धा नागरी सहकारी अधिकोष बँकेचे सन २०२६ ची रंगीत दिनदर्शिकेचे नगरसंघ चालक डॉ. प्रसाद देशमुख यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष मंगेश परसोडकर यांची उपस्थिती होती.
 
 
 
wardha-cooperative-bank
 
 
wardha-cooperative-bank वर्धा नागरी बँकेकडून निघणार्‍या दिनदर्शिकेची बँकेचे ग्राहकच नव्हे तर सामान्य नागरिक वाट पाहतात. संपूर्ण वर्षाच्या सण, तिथी, शुभमुहूर्त, शासकीय व बँकेला असलेल्या सुट्या, बँकेच्या सर्व शाखांचे पत्ते, संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ सदस्यांचे मोबाईल क्रमांक. सर्व शाखेचे मोबाईल क्रमांक, आयएफएससी क्रमांक, बँकेद्वारे देण्यात येणार्‍या सुविधा, कर्ज योजना आदींची माहिती आहे. यावेळी संचालक दामोदर दरक, जयंत येरावार, अ‍ॅड. सुवर्णा काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास दाताळकर आदी उपस्थित होते.