वर्धा,
wardha-kho kho-sports सहयोग शिक्षण प्रसारक मंडळ वर्धाद्वारा ''प्रदीप की याद में'' विदर्भ राज्य स्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन स्थानिक जुने आरटीओ मैदान प्रतापनगर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत विदर्भातील महिला व पुरुषांची ३५ संघ सहभागी झाले होते. त्यात पुरुष गटात विदर्भ क्रीडा मंडळ काटोल तर महिलांत नवजयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. मंडळाचे माजी राष्ट्रीय खो-खो पटू दिवंगत प्रदीप महाजन यांच्या स्मृतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खा. अमर काळे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, संजय इंगळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सुषिता भोयर, किशोर कोकाटे, अतुल तराळे, डॉ. यशवंत हिवंज, प्रशांत पांडे, कैलाश बाकरे, विजय धनवलकर, संजय पिल्लेवार, नरेंद्र दिघडे आदी उपस्थित होते.
(संग्रहित छायाचित्र)
wardha-kho kho-sports महिला विभागात अनंत क्रीडा मंडळ अकोला विरुद्ध छत्रपती युवक क्रीडा मंडळ नागपूर हे दोन संघ लढले. या सामन्यात अनंत क्रीडा मंडळ अकोला संघ विजय प्राप्त करून अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. दुसरी लढत नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ व विदर्भ युथ क्रीडा मंडळ लाडगाव या संघात झाली. नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ महिला संघ विजयी ठरला. पुरुष विभागात उपान्त्य फेरीचा प्रथम सामना सिटी पोलिस नागपूर विरुद्ध राजापेठ स्पोर्टींग लब, अमरावती यांच्यात झाला. अत्यंत चुरशीचा हा सामना दोनवेळा बरोबरीत राहीला. तिसरा डाव सडन डेज नियमानुसार खेळला गेला. मागील १५ वर्षांत पहिल्यांदाच या नियमाचा उपयोग करण्याची गरज पडली. त्यात राजापेठ स्पोर्टींग लब, अमरावती हा संघ विजयी होऊन अंतिम फेरीत पोहोचला.
wardha-kho kho-sports दुसरा सामना विदर्भ क्रीडा मंडळ, काटोल विरुद्ध विदर्भ युथ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ काटोल यांच्यात झाला. यात विदर्भ क्रीडा मंडळाने विजय प्राप्त करीत अंतिम फेरी गाठली. सायंकाळच्या सत्रात तिसर्या क्रमांकासाठी दोन सामने झाले. यात पुरुष विभागात विदर्भ युथ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, काटोल तर महिला विभागात छत्रपती युवक क्रीडा मंडळ, नागपूर विजयी झाले. पुरुष विभागात अंतिम सामना विदर्भ क्रीडा मंडळ, काटोल व राजापेठ स्पोर्टींग लब, अमरावती या दोन संघादरम्यान झाला. हा सामना विदर्भ क्रीडा मंडळ, काटोल संघाने ३ मिनिटांचा वेळ राखून जिंकला व स्पर्धेत अव्वल संघ ठरला. महिलांच्या अंतिम लढतीत नवजयहिंद क्रीडा मंडळ, यवतमाळने अनंत क्रीडा मंडळ अकोल्याचा पराभव करीत स्पर्धेचे विजेपेपद आपल्याकडे ठेवले.