नागपूर एअरपोर्टला सोडून येतांना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या गाडीला किरकोळ अपघात ...

ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड ही सुखरूप ..

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
बुलढाणा,
prataprao jadhavs केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर येथील एअरपोर्टला सोडून दिल्यानंतर त्यांची खाजगी गाडी समृद्धी महामार्गाने मेहकरकडे परत येत असतांना मालेगाव जवळ गाडीला किरकोळ अपघात झाला या अपघातामध्ये बॉडीगार्ड व ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले. अनेक जण आस्थेने विचारपूस करत असल्यामुळे त्यांचे सर्वांचे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार व्यक्त केले आहे.
.

prataprao jadhav 
 
 
27 डिसेंबर रोजी भारताचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाला अमरावती येथे केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित राहिले होते त्यानंतर मुंबई येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी नागपूर विमानतळावर आले आणि मुंबईला गेले त्यांची खाजगी गाडी त्यांना सोडून मेहकर कडे समृद्धी महामार्गाने येत असतानाच मालेगाव जवळ गाडीला किरकोळ अपघात झाला. या गाडीमध्ये ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड होते त्यांना किरकोळ मला लागला त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आली उपचारानंतर त्या दोघांनाही सुट्टी झाली आहे.prataprao jadhavs
केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव त्यांच्या गाडीला अपघात या मथळ्याखाली ... अपघातांच्या बातम्या न्युज चैनलवर प्रसारीत झाल्या आणि काही वर्तमानपत्रात छापून आल्यात त्यामुळे अनेक जण आस्थेने माझी विचारपूस करत आहे त्या सर्वांचे आभार मानून आपल्याला काहीही झाले नसल्याचा खुलासा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे.