गोपाल चिकाटे
तळेगाव (श्या.पं.),
datta-shikhar-for-aarti : नागपूर-अमरावती मार्गावरील दत्त शिखर हे अडीचशे वर्ष पुरातन दत्त मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम सन १७२० मध्ये झाले असल्याचा उल्लेख पोथीन आहे. येथे दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त यात्रा भरते. ४ व ५ रोजी दत्त जयंती यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंदिराची विशेषत: म्हणजे गडावर असलेल्या या मंदिरात दररोज रात्री होणार्या आरतीकरिता एक श्वास न चुकता हजेरी लावतो. प्रसाद वाटत होताच हकलण्यापूर्वी तो श्वास निघून जातो.

उद्या ४ रोजी दत्त जयंतीनिमित्त सकाळपासून दत्त भतांची दर्शनासाठी गर्दी राहणार आहे. दुसर्या दिवशीपासून यात्रा महोत्सवाला सुरूवात होणार आहे. पुरातन काळात येथे एक मोठे मातीचे भंडार घर होते. मोठ्या प्रमाणात भंडारा व्हायचा. पण, ते आता दिसेनासे झाले असून अडीचशे वर्षांपूर्वी नारायण गाडगे (भट) यांनी दत्ताची स्थापना केली. नारायण महाराज गाडगे यांच्या आईच्या प्रेरणेने बालपणापासून ते माहूर येथील दत्तगड येथे वारी करीत होते. अनेक वर्षे त्यांनी वारी केली. परंतु, वयोमानानुसार त्यांना वारी करणे शय झाले नाही तेव्हा त्यांनी तळेगाव श्या. पं. येथे गावाच्या पश्चिमेला असलेले शिखरावर श्रीदत्त पादुका, अत्रिलिंग यांची स्थापना करून तेच या पिठाचे पहिले महंत ठरले. त्यांच्या संपर्कात अनेक महंत ज्ञानी अशी मंडळी आली. आजही दत्तगडावर दररोज आनंद संप्रदायाच्या परंपरेनुसार येथे विधी चालतात. शिखरगडावर सभा मंडप असून त्या सभा मंडपावर प्रशस्त नक्षीकाम केलेले आहे. सभा मंडपावर पुरातन काळात काहीतरी मोडी लिपीने मंडपाच्या एका खांबावर कोरलेले आहे. दत्त जयंतीनिमित्त शिखरगडावर ५० हजारांच्या वर भाविक दर्शनाचा लाभ घेतात.
आजही रोज रात्री आरतीच्या वेळी श्वान सुद्धा आरतीचा लाभ घेतात असे सांगितल्या जाते. अडीचशे वर्षांपूर्वी भट महाराजानंतर जनार्दन महाराज गाडगे, एकनाथ महाराज गाडगे, दीनानाथ महाराज गाडगे व आता त्या शिखरगडाचे बाबा महाराज गाडगे पुढे वारसा चालवित आहे. शिखर गड परिसरात अनुसया मातेचे मंदिर आहे. गडावर चढण्याकरिता ३० ते ३२ पायर्या असून पायर्यावर शंकराचे मंदिर आहे. गडावर चढल्यानंतर चारही बाजूने निसर्गरम्य परिसर पहावयास मिळतो.