तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Agricultural market committee issues कृषी उत्पन्न बाजार समिती शेडमध्ये व्यापाèयांच्या खरेदी केलेल्या थप्प्यांमुळे शेतकèयांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल अडगळीत टाकण्याची वेळ येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असला तरी व्यापारी मात्र थप्प्या उचलून घेत नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे बाजार समिती प्रशासनाकडूनही कारवाई होत नसल्याने व्यापाèयांची मनमानी की बाजार समिती प्रशासनाचा लळा, असा प्रश्न शेतकèयांतून व्यक्त होत आहे.
सध्या तालुक्यातील शेतकèयांच्या मालाची विक्री सुरू आहे. शेतकरी बाजार समितीत सोयाबीन, कापूस विक्रीकरिता आणतात तेव्हा व्यापाèयांचा विक्री केलेल्या मालाची थप्पी शेडमध्ये असल्याने शेतकèयांना माल बाहेर टाकण्याची वेळ आली आहे. व्यापाèयांच्या विक्री केलेल्या मालांची थप्पी शेडमध्ये साठवून आहे. परिणामी व्यापाèयांच्या मालाच्या थप्प्या सतत वाढत असताना बाजार समिती प्रशासनाने असलेल्या मालाच्या थप्प्या उचलण्यास सांगावे, अशी मागणी शेतकèयांकडून होत आहे.एवढेच नाही तर यार्डात व्यापाèयांनी ठेवलेल्या मोठमोठ्या थप्प्यांमुळे शेतकèयांकडून शेतमालाची आवक हाताळणे हमालांसाठीही अवघड होत आहे. अशा परिस्थितीत एकापेक्षा अनेक दिवस थप्प्या ठेवणाèया व्यापाèयांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारणे अपेक्षित आहे.
व्यापाऱ्यांची खरेदी केलेल्या मालशेडमध्ये वाढती मनमानी शेतकऱ्यांच्या मुळावर बाजार समितीमधील असलेल्या शेडमधील निम्म्याहून अधिक भाग व्यापाèयांच्या थप्प्यांनी व्यापल्यामुळे शेतकèयांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल टाकण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. परिणामी, शेतकèयांचा माल बाहेर असलेल्या ओट्यावर टाकावा लागत आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने शेतकèयांचा शेतमाल शेडमध्ये टाकण्यासाठी व्यापाèयांचा शेडमधील असलेला माल त्वरित उचलून बाजार समितीने व्यापाèयांपेक्षा शेतकèयांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.