अमरावती जिल्ह्यात सरासरी 68.38 टक्के मतदान

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
अमरावती,
amravati news अमरावती जिल्ह्यातल्या 9 नगरपरिषद व 2 नगरपंचायतच्या 11 अध्यक्ष व 244 सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते 5.30 पर्यंत मतदान झाले. त्याची अंतिम आकडेवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात सरासरी 68.38 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक 85.23 टक्के मतदान चिखलदरा येथे झाले आहे.
 

amravti voting
 
 
नगरपरिषद अचलपूर येथे 69.73, वरुड 64.07, दर्यापूर 68.66, मोर्शी 65.78, चिखलदरा 85.23, शेंदुरजनाघाट 75.53, चांदुर रेल्वे 68.49, चांदूरबाजार 67.13, धामणगाव रेल्वे 67.21, नगरपंचायत धारणी 64.43, नांदगाव खंडेश्वर येथे 73.30 टक्के मतदान झाले आहे.amravati news  पूर्ण जिल्ह्यात सरासरी 68.38 टक्के मतदान झाले आहे.