जिल्ह्यात नगर परिषदांसाठी 67 टक्के मतदान

पवनी आघाडीवर, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक उत्साह

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
भंडारा,
Bhandara municipal elections, जिल्ह्यातील चार नगरपरिषदांसाठी दोन डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत एकूण 1 लाख 14 हजार 170 मतदारांनी मतदान करीत 67.3 टक्के मतदानाची नोंद केली आहे. सर्वाधिक मतदान पवनी नगर परिषदेसाठी 73.54 एवढे झाले. विशेष म्हणजे जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांनी मतदानाचा हक्क अधिक प्रमाणात बजावला.
 

Bhandara municipal elections, 
 
 
भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चार नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि नगरसेवक निवडीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले. चारही नगरपरिषद मिळून एकूण 1,70,315 एवढे मतदार होते. यापैकी 1,14,170 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 57746 महिला व 56423 पुरुष मतदारांचा समावेश आहे.
 
जिल्ह्यातील पवनी नगर परिषदेसाठी सर्वाधिक 73.54 टक्के मतदान झाले. 22270 मतदारांपैकी येथे 16378 मतदारांनी मतदान केले. त्या खालोखाल साकोली नगरपरिषदेत 16159 मतदारांनी मतदान करीत 71.24 टक्के मतदानाची नोंद केली. भंडारा पालिकेसाठी सर्वात कमी 62.68 टक्के मतदान झाले. येथे 85608 पैकी 53660 मतदारांनी मतदान केले. तुमसर नगरपालिकेतील 70.36 टक्के मतदान झाले. 27973 मतदारांनी येथे हक्क बजावला. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत अधिक महिला मतदारांनी आपले कर्तव्य पार पाडले. जिल्ह्यातील चारही पालिकेतील सरासरी मतदानाची टक्केवारी पाहता मतदार अजूनही आपल्या कर्तव्याप्रति फारसा गंभीर नसल्याचे दिसते.