पराभवाच्या भीतीने बदनामीचा कट

-भाजपाचा आरोप - कामठी फार्म हाऊस धाड

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
नागपूर,
bjp-municipal-council-elections : नगर परिषद निवडणुकीदरम्यान काल मंगळवारी छापा पडला त्या सुनील अग्रवाल व त्याच्या फार्म हाऊसशी भाजपाचा काहीही संबंध नसून बरिएमंने बदनामीचा कट रचल्याचा आरोप भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय अग्रवाल तसेच भाजपाचे जिल्हा महामंत्री अनिल निदान यांनी पत्रकार परिषदेत केला.
 
 
 
bjp
 
 
 
अनिल निदान म्हणाले की, विरोधकांकडून खोटे आरोप लावून भारतीय जनता पक्ष व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीमध्येे बहुजन रिपब्लिकन एकता मंचला नगराध्यक्षपदाची उमेदवारी न दिल्यामुळे आरोप करीत सुटले आहेत.
 
 
मागील 2017 च्या निवडणुकीत युतीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे अजय कदम यांना नगराध्यक्षपदाची उमेेदवारी देण्यात आली होती. तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पायाला दुखापत झाली होती. तरीही त्यांनी 88 सभा घेऊन प्रचार केला. मात्र, तेव्हा पराभव झाला. यंदा भाजपाने ठरवले की, पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल यांना नगराध्यक्ष उमेदवारी द्यावी. उपाध्यक्ष पद बहुजन रिपब्लिकन एकता मंचला द्यावे तसेच नगरसेवकाची भाजपपेक्षा जास्त जागा द्याव्यात. यासंबंधी त्यांच्याशी बोलणेही झाले. मात्र, त्यांना भाजपाविरोधात अजय कदम यांना अपक्ष म्हणून उभे केले.
 
 
निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून बहुजन रिपब्लिकन एकता मंचने भाजपा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बदनाम करण्याचे काम सुरू केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केले. प्रचार सभा अडवण्याचा पआयत्न झाला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीा दिलेल्या निधीतून तयार करण्यात आलेल्या भागुबाई सभागृहात आयोजित सभा अजय कदम यांनी उधळून लावली. त्या सभागृहात सभा घेण्यास मनाई केली.
 
 
या निवडणुकीआधी सुलेखाताई कुंभारे बावनकुळे यांची प्रशंसा करायच्या. त्याच आता उमेदवारी न दिल्याने बावनकुळे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे कामठीचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूलमंत्री आहेत. त्यांचा प्रयत्न नेहमीच कामठीच्या विकासाचा असतो. त्यांच्या प्रयत्नामुळेच शहराला मेट्रो रेल्वे मिळाली, अनेकांना पट्टेवाटप केले. ड्रॅगन पॅलेसला जाण्यासाठी रेल्वे उड्डाण पूल, रस्त्याचे निर्माण केले. पंतप्रधान आवास योजनेत बेघरांना 5 हजार घरे देण्याचे नियोजन आहे.
 
 
फार्म हाऊसशी संबंध नाही
 
 
भाजपाचे उमेदवार अजय अग्रवाल म्हणाले की, काल मतदानाच्या दिवशी सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवर छापा घालण्यात आला. ते माझे मामे भाऊ आहेत. त्यामुळे त्या घटनेशी माझाही संबंध जोडला जात आहे. त्या फार्म हाऊसवरील छापा म्हणे भाजपला बदनाम करण्याचाच कट आहे. त्यासाठी काँग्रेस उमेदवार शकूर नागाणी यांना सोबहत घेतले.
वास्तविक हा फार्म हाऊस कामठीच्या बाहेर आहे. त्याचा कामठीच्या निवडणुकीशी संबंध नाही. आम्हाला बदनाम करण्यासाठी कुंभारेंनी आपली माणसे आणून धाड टाकली, पराभवाच्या भीतीने असा कट रचला गेला, असा आरोप अजय अग्रवाल यांनी केला. अर्थात भाजपाचा उमेदवार निवडून येईल, असे ते म्हणाले, भाजपाचे जिल्हा व्यापारी महामंत्री विवेक मंगतानी उपस्थित होते.