ज्येष्ठ शाहीर बुधाजी भलावी यांचे कलावंत गौरव पुरस्कारापूर्वी हृदयविकारामुळे निधन

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
भंडारा,
Budhaji Bhalavi death राज्य सांस्कृतिक कला संचालनालयाकडून मुंबईमध्ये आयोजित कलावंत गौरव पुरस्कार समारंभासाठी जात असताना भंडारा जिल्ह्यातील दहेगाव (ता. लाखांदूर) येथील ज्येष्ठ झाडीपट्टी कलावंत शाहीर बुधाजी भलावी (७८) यांचे आज पहाटे सुमारे ५:४५ वाजता हृदयविकाराचा झटका येऊन अकाली निधन झाले.
 

Budhaji Bhalavi death 
मुन्नी सहकुटुंबियांसह Budhaji Bhalavi death कारने दहेगावहून मुंबईकडे निघालेल्या बुधाजी भलावी यांना मार्गात विक्रोळी येथे आदी आरोग्यम् रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तात्काळ त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर पार्थिव शववाहिकेद्वारे दहेगाव येथे नेण्यात येणार असून, गुरूवारी सकाळी त्यांच्या अंत्यसंस्काराचे पार पडतील.मुंबईतील रविंद्र नाट्य कलामंदिरामध्ये बुधवारी होणाऱ्या गौरव समारंभात राज्यातील ८४ ज्येष्ठ आणि युवा कलावंतांचा सन्मान करण्यात येणार होता. बुधाजी भलावी यांना ‘खडी गंमत’ या कला प्रकारासाठी ज्येष्ठ कलावंत म्हणून ३ लाख रुपयांचा पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार होते.शाहीर बुधाजी भलावी हे कलगी-तुरा या कलाप्रकारात विशेष नावाजलेले होते. तुर्रा शाखेचे ते ज्येष्ठ व नामवंत शाहीर होते. ‘बुधा शाहीर’ या नावाने ते विदर्भासह महाराष्ट्र व मध्यप्रदेशात लोकप्रिय होते. तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ, त्यांनी ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाचे दर्शन घडवून मनोरंजनाची एक वेगळी दिशा दिली.
 
 
त्यांच्या अकाली निधनामुळे सांस्कृतिक क्षेत्रात शोककळा पसरली असून, कलासंस्थांनी आणि कला रसिकांनी त्यांच्या योगदानाला श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील लोककलांच्या क्षेत्रात मोठा मोकळा उडाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.