बुलढाणा,
buldhana-news : जिल्ह्यातील १० नगरपरिषदेच्या निवडणुकांचे मतदान प्रक्रिया दि. २ डिसेंबरला पार पडली बोगस मतदान मतमशीन बंद पडणे, हाणामारी शाब्दिक वादाने राजकीय वातावरण ढवळून निघाले न्यायालयाने निवडणुकीची मतमोजणी उर्वरित रखडलेल्या नपा निवडणुकीच्या मतदानानंतर थेट २१ डिसेंबर रोजी होण्याचे आदेश निर्गमित केल्याने येत्या अठरा दिवसापर्यंत शहरातील गप्पांच्या फडावर एकच चर्चा कोणत्या प्रभागात कोण जास्त कमी मतदान घेणार कोण निवडून येणार मतदानाचा टक्का वाढला घसरला त्याचा फायदा कोणाला होणार कोणता समाज कोणाकडे झुकला याशिवाय मतदान मशीन इतकी दिवस स्ट्राँग रूम मध्ये राहतील कोण काही गडबड करतील का अशा गप्पांनी सध्या रंगत भरली आहे.

सर्वाधिक मतदान सिदंखेडराजा नगरपालिकेत (८५.०८) टक्के तर सर्वात कमी बुलढाणा नगरपालिका (५४.२०) टक्के मतदान झाले आहे. बुलढाणा निवडणुकीत चार केंद्रावर बोगस मतदान झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिकेत पक्षांच्या निष्ठावंतांना डावलून उमेदवारी दिल्याने तिकीट वाटण्यापासूनच निवडणुकीला गालबोट लागले होते भाजपचे जुन्या काळातील एकनिष्ठ जगदेवराव बाहेकर यांच्या सुनेचे उमेदवारी डावलून शेतकरी संघटनेतून आलेल्या पवन देशमुख ला उमेदवारी देण्यात आली. तसेच जुन्या पिढीतील उदय भास्करराव देशपांडे यांना सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर डावलण्यात आली या संतापामुळे अनेकांनी मतदान केले नसल्याची चर्चा आहे तसेच जगदेवराव बाहेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना निष्ठावंतांना का डावलले असा प्रश्न उपस्थित करून आमच्या हक्काच्या प्रभागात उमेदवारी का दिली नाही असे आवर्जून सांगितले आहे.