कारंजा लाड,
CCI cotton केंद्र सरकारच्या सीसीआय कडून कापूस खरेदीची अधिकृत सुरुवात १८ नोव्हेंबर रोजी कारंजा येथील तिरुमला जिनिंग प्रेसिंग फॅटरीत करण्यात आली. शेतकर्यांसाठी दिलासा देणार्या या खरेदीचा शुभारंभ आमदार सई डहाके यांच्या हस्ते झाला. त्यानंतर आठवडाभरात या केंद्रावर ४४ शेतकर्यांच्या ६३९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
सीसीआय ने कापूस खरेदीसाठी प्रति एकरी ६.५० क्विंटलची मर्यादा निश्चित केली आहे.ही मर्यादा लक्षात घेऊनच प्रत्येक शेतकर्याच्या विक्रीयोग्य कापसाचे किलो प्रमाण निश्चित केले जात आहे. शिवाय शेतकर्यांच्या नोंदणीत नमूद केलेल्या क्षेत्रफळानुसारच खरेदी केली जात असल्याचे सीसीआय अधिकार्यांनी स्पष्ट केले. मुक्त बाजारात कापसाला मोठे चढउतार पहायला मिळत असताना,सीसीआय कडून ८ हजार रुपये हमीभाव मिळत असल्याने शेतकर्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे. बाजारपेठेतील अनिश्चिततेपासून संरक्षण मिळावे यासाठीच सरकारने हमीभाव खरेदी यंदाही सुरू ठेवली आहे. फॅटरी परिसरात सुरक्षा आणि शिस्त राखून खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे.ज्या शेतकर्यांना संदेश प्राप्त झाले आहेत, फक्त त्यांचाच कापूस मोजून घेतला जाणार आहे. संदेश मिळाल्यानंतरच शेतकर्यांनी कापूस घेऊन खरेदीस्थळी यावे, असा सल्ला अधिकार्यांनी दिला आहे.
खरेदीस्थळी वजन CCI cotton काटे, ओलावा तपासणी मशीन आणि गुणवत्तानुसार सेग्ग्रिगेशनची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली असून शेतकर्यांची गर्दी टाळण्यासाठी वेळेच्या स्लॉटनुसारच मोजणी केली जाईल. कापूस उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम हवामानातील अनिश्चिततेमुळे खर्चिक ठरला होता. या पार्श्वभूमीवर सीसीआय खरेदी सुरू झाल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधान दिसून येत आहे. कापूस खरेदीच्या प्रारंभामुळे शेतकर्यांना दिलासा मिळणार असून, पुढील काही दिवसांत खरेदीला आणखी वेग येण्याची शयता आहे.