तभा वृत्तसेवा राळेगाव,
Ralegaon cotton rate यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. परंतु अती पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. कापसाला देखील त्याचा फटका बसला आहे. त्यात लाल्या आणि बोंड अळीमुळे नुकसानीत भरच पडली. तरीही चांगला भाव मिळेल या आशेवर असलेल्या शेतकèयाच्या तोंडाला पानेच पुसल्या गेल्याचे चित्र दिसत आहे. खासगी बाजारात कापसाला 7 हजार रुपये प्रतीक्विंटल भाव मिळत असल्यामुळे साहेब आम्ही जगायचे कसे असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.
तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड झाली होती. ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान या पिकावर अतिवृष्टीसह किडींचाही प्रादुर्भाव जाणवला. त्यातच शेती कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकèयांना मजुरांसाठी शोधाशोध करावी लागत आहे. मजुरांची मनधरणी करण्याचे काम शेतकरी करताना दिसून येत आहेत.
काही शेतकरी बाहेरगावाहून मजूर आणतात. मात्र या मजुरांना ने-आण करण्यासाठी वाहनाचा खर्च करावा लागतो. आधीच शेती साहित्याच्या वाढलेल्या दरांमुळे मेटाकुटीस आला आहे. खतांच्या व औषधींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामध्ये उत्पादन क्षमता देखील कमी झाली आहे.यावर्षीचा कापूस विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. यंदाही खासगी बाजारात कापसाला अपेक्षित असे दर मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडत चालला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने अनेक शेतकèयांनी कापसाचा पेरा केला होता. मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व सीसीआयच्या किचकट प्रक्रियेमुळे कापूस पडेल त्या भावात शेतकèयांना विकावा लागत आहे.
दिवसेंदिवस औषधी, बियाणे, खताच्या किमतीने शेतकèयांचे कंबरडे मोडले आहे. मजुरांच्या मजुरीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परंतु शेतमालाच्या किमती वाढत नाहीत. उलट दर वर्षांत भावात घसरण होत आहे. सहा वर्षातून फक्त 2022 मध्येच कापसाचे दर 10 हजार रुपये झाले होते. मात्र त्यानंतर हे दर कमी झाले असून रासायनिक खते व बियाण्यांच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ झाली आहे.
सहा वर्षांत एकदाच 10 हजार भाव
2019 ----5500
2020----5500
2021----7000
2022----10’000
2023-----7000
2024-----7000
2025-----7000
2026-----7000