दिल्ली एमसीडी निवडणूक...विजयी उमेवारांची यादी!

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Delhi MCD Election 2025 दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) १२ वॉर्डांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या पोटनिवडणुकांमध्ये विविध वॉर्डांमध्ये राजकीय स्पर्धा जोरात होती. काही ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले, तर काही ठिकाणी आम आदमी पक्षाने आपली पकड दाखवली. काँग्रेसनेही संगम विहार वॉर्डमध्ये विजय मिळवून महत्त्वाची जागा जिंकली आहे. दिचौन कलान वॉर्डमध्ये भाजपच्या रेखा राणी यांनी ५,६३७ मतांनी दणदणीत विजय मिळवला. संगम विहार वॉर्डमध्ये काँग्रेसचे उमेदवार सुरेश चौधरी विजयी ठरले. त्यांना १२,७६६ मते मिळाली, तर भाजपचे सुभ्रजीत गौतम ९,१३८ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आले. हा विजय काँग्रेससाठी दीर्घ कालावधीनंतर मनोबल वाढवणारा मानला जात आहे.
 
dilhid
 
 
दक्षिण पुरी वॉर्डमध्ये आम आदमी पक्षाने आपली पकड कायम ठेवली. राम स्वरूप कनोजिया १२,३७२ मतांनी विजयी ठरले, तर भाजपच्या रोहिणी १०,११० मतांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. चांदणी चौक वॉर्डमध्ये भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले. सुमन गौर गुप्ता यांना ७,८२५ मते मिळाली, तर आम आदमी पक्षाचे हर्ष शर्मा ६,६४३ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. द्वारका बी जागा भाजपच्या मनीषा देवींनी जिंकली.
शालीमार बाग वॉर्डमध्ये भाजपच्या अनिता जैन यांना १६,८४३ मतांनी विजय मिळाला, तर आम आदमी पक्षाच्या बबिता राणाला ६,७४२ मते मिळाली. हा विजय भाजपसाठी राजधानीच्या उत्तरेकडील भागात मजबूत पकड दर्शवतो. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (AIFB) ने एका जागेवर आघाडी मिळवून लक्ष वेधले. काही वॉर्डमध्ये स्थानिक मुद्दे आणि प्रादेशिक नेत्यांचा प्रभाव महत्त्वाचा ठरला.
विनोद नगर वॉर्डमध्ये त्रिकोणी स्पर्धा सुरू होती, जिथे भाजपकडून सरला चौधरी, आपकडून गीता रावत आणि अपक्ष/लहान पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत होते. ३६.४७% मतदानासह या वॉर्डमध्ये निकाल अधिक रोमांचक ठरला. संपूर्ण निकाल पाहता, दिल्लीच्या १२ वॉर्डांमध्ये भाजप, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी काही जागा जिंकल्या असून, राजकीय स्पर्धा तीव्र राहिली आहे.