हरिद्वार,
Deol family to Haridwar दिवंगत बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन बुधवारी हरिद्वार येथे त्यांच्या मुलांनी सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. देओल कुटुंबाने पूर्ण विधी अत्यंत खाजगी पद्धतीने पार पाडला. यासाठी हरिद्वारमधील एक खाजगी हॉटेल बुक करण्यात आले होते आणि तेथील खास घाटावर विसर्जनाची प्रक्रिया झाली. सनी आणि बॉबी यांच्यासोबत करण देओल, राजवीर देओल आणि आर्यमन देओल हेही सहभागी होते. धर्मेंद्र यांच्या अस्थी गंगेत वाहिल्यानंतर सनी आणि बॉबी यांनी नदीत स्नान करून धार्मिक विधी पूर्ण केले. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, चाहत्यांनी भावपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

२४ नोव्हेंबर २०२५ रोजी ८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांचे निधन झाले. वृद्धापकाळातील गुंतागुंतींमुळे त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि श्वासोच्छ्वासात अडचण निर्माण झाल्याने त्यांना मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गोपनीयतेसंदर्भातील समस्या वाढताच कुटुंबाने त्यांना परत घरी नेऊन तेथेच उपचार चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या क्षणी धर्मेंद्र कुटुंबाच्या सहवासातच होते, असे त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सांगितले.