देवस्थान श्री दतप्रभू संस्थान अंबाळी येथे जन्मोत्सव महाप्रसाद पालखी यात्रा उत्सव

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
shri-dattaprabhu-sansthan-ambali : प्रख्यात प्रचलित असलेले महानुभाव पंथातील जागृत व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे क्षेत्र अंबाळी येथील दत्तात्रेय मंदिर हे 500 वर्षापूर्वीचे मंदिर आहे. या मंदिरावर शी दत्तप्रभूंचा जन्मोउत्सव महाप्रसाद पालखी यात्रा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, 4 डिसेंबरला होणार आहे.
 
 
 
y3Dec-Ambali
 
 
 
अंबाळी येथे 4 डिसेंबर रोजी पौर्णिमेला प्रात:काळी शी प्रभुच्या विशेषाचे स्नान उटी उपहार असतो व शीदतात्रेय कवच व गीता पारायण नामस्मरण असते. दुपारी आरती व महाप्रसाद असतो. महाप्रसाद अंबाळी गावकरी भक्त मंडळी आयोजनाची परंपरा असते. महाप्रसादाला पंचकोषीतील भावीक भक्त गण लाभ घेतात. दुपारपासून ते सायंकाळपर्यंत महाप्रसाद वितरण वाटप करण्यात येतो. 5 डिसेंबरला शी दतात्रेय विशेषाची पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते पालखी सोहळ्याला हजारो भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थीत असतात. यात्रा भव्य दिव्य असते. हा सोहळा तीन दिवस असतो एक दिवस अंबाळी गावात यात्रा असते.
 
 
श्री दतात्रेय प्रभू मंदिराचे अध्यक्ष भाऊसाहेब साले, सचिव नाना झरकर, उपाध्यक्ष भीमराव चंद्रवंशी व विश्वत मंडळ व पुजारी नंदकिशोर खामनेकर मंदिराची देखरेख करतात. गंगणमाळ येथे शी दत उत्सवात कबड्डीचे खुले सामने 75 वर्षांची अखंडित सेवा आहे. सत्यपाल महाराजांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असणार आहे.