नागपूर,
Disability Empowerment Department जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमी विभाग, जिल्हा परिषद नागपूर तसेच दिव्यांग मुलांसाठी कार्यरत शासकीय अनुदानित व विनाअनुदानित शाळा/कर्मशाळांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गांधीबाग उद्यान येथून भव्य रॅली काढण्यात आली.
विविध संघटना व संस्थांच्या वतीने रॅलीतील विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच खाऊ वाटपही करण्यात आले.Disability Empowerment Department चिटणीस पार्क येथेही विविध कार्यक्रम पार पडले.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
सौजन्य : मित्र सुरेश चव्हारे,संपर्क मित्र