तभा वृत्तसेवा
आर्णी,
election-arni : आर्णी नगर परिषदेच्या निवडणुकीत नप अध्यक्षपदासाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. तर सदस्यपदासाठी 114 उमेदवार उभे होते. 2 डिसेंबरला मतदान झाले. या निवडणुकीत 26 हजार 857 मतदारांपैकी 17 हजार 903 म्हणजेच 66.66 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अशी माहीती आर्णी नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी वैशाख वाहुरवाघ तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र राऊत यांनी दिली.
सकाळी काही मतदान केंद्रावर ईविएममध्ये बिगाड झाल्याचे दिसून आले. तेथे दुसरे इविएम दिले. मतदान केंद्रावर सकाळी 10 वाजेपर्यंत थंडीमुळे मतदाराची गर्दी कमी दिसुन आली. दुपारी तीन नंतर मात्र मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी वाढली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संध्याकाळी 6.30 पर्यंत काही मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु होती. जिल्हा पोलिस अधीक्षकासह आमदार राजू तोडसाम यांनी मतदान केंद्रावर भेटी दिल्या.
भाजपा शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस शर्यतीत
आर्णी नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी आपला कौल ईव्हीएमचे बटन दाबून दिले आहे. आता 21 डिसेंबरला होणाèया मतमोजणीवर लक्ष केंद्रित झाले आहे. नपच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले. मात्र यापैकी कोण निवडून येणार हे 21 डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे.