छत्रपती संभाजीनगर,
fake IAS officer शहरातील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून तब्बल सहा महिन्यांपासून वास्तव्यास असलेली महिला कल्पना भागवत यावर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. तपासात समोर आले आहे की या महिलेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी थेट संबंध आहेत, तर तिने स्वतःला आयएएस अधिकारी असल्याचे सांगत अनेकांकडून पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी कल्पना भागवत याची कसून चौकशी सुरु केली असून, त्यांच्या जवळून धक्कादायक कागदपत्रे आणि मोबाईलमधून महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे मोठा रॅकेट उघडकीस आला असून, पैशांचे व्यवहार, आंतरराष्ट्रीय संबंध आणि बनावट कागदपत्रांची साखळी हळूहळू समोर येत आहे.
या प्रकरणात fake IAS officer हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव देखील समोर आले आहे. खासदार पाटील यांनी या नावाबाबत बोलताना सांगितले की, "काल मला हा सगळा विषय लक्षात आला. माझी आणि त्या तोतया अधिकाऱ्याची भेट झाली होती हे खरं आहे. माझ्या चुलत भावाच्या मुलाची तिच्यासोबत ट्रेनमध्ये भेट झाली होती. तिने मंदिराला देणगी देण्याची विनंती केली होती. मग ती तोतया अधिकारी माझ्याकडे गावी आली आणि मला भेटली."नागेश पाटील आष्टीकर यांनी पुढे सांगितले की, "मी सुरुवातीला २० हजार रुपये मदतीसाठी दिले होते. नंतर २-३ वेळा काही पैसे दिले. आई आजारी असल्याने तिने दीड लाख रुपये मागितले होते. मला कोल्हापूरमध्ये तिचा अपघात झाल्याचे एका पुरुष व्यक्तीने फोनवर सांगितले, त्यावेळी मी १० हजार रुपये पाठवले. शेवटचे पैसे मी २९ ऑक्टोबर रोजी पाठवले."
त्यांनी स्पष्ट केले की, "मी या विषयाला फार गांभीर्याने घेतले नव्हते, पण अडचण असल्याने मदत केली होती. माझ्या वडिलांपासून मी राजकारणात असून, माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी वाटप करत असतो."या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या कल्पना भागवत यांच्या नेटवर्कचा सविस्तर तपास करत असून, आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि पैसे घेण्याच्या व्यवहारांचा छडा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.