वस्तीतील बसवेगावर नियंत्रणाची मागणी !

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Fast school buses शहरातील वस्तीच्या आतल्या लहान, अरुंद गल्ल्यांतून शाळांच्या बसेस अतिवेगाने धावत असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सकाळ-संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वाहतूक होत असल्यामुळे बसांची वाहतूक वाढली आहे; मात्र चालकांचा निष्काळजी वेग पाहता कधीही गंभीर अपघात घडू शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.
 
kale
 
 
स्थानिकांचे म्हणणे आहे की, रस्ते अतिशय अरुंद असून अनेक ठिकाणी वळणदार आहेत. अशा भागातून भरधाव बस जाताना पादचारी—विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले—यांचे हाल होतातFast school buses . अनेक प्रसंगी बस अगदी जवळून गेल्याने अपघात टळले आहेत, तर काहीजण घराबाहेर पडायलाही कचरू लागले आहेत.नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करत बसांच्या वेगावर नियंत्रण, चालकांना कडक सूचना, तसेच वस्तीतील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्याची मागणी केली आहे.
सौजन्य :प्रशांत काळे,संपर्क मित्र