तुरुंगातील वेदना, शारीरिक नाही पण मानसिक छळ!

बहिणीसमोर उघडले इम्रान खानचे अंत:करण

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
इस्लामाबाद ,
Imran Khan opens up to his sister मंगळवार, २ डिसेंबर २०२५ रोजी रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात कैद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या बहिणी उज्मा खान यांची भेट घेतली. २०-२५ मिनिटांच्या या भेटीत इम्रान खान भावनिक झाले आणि त्यांनी आपल्या कैदेत सहन केलेल्या मानसिक छळाचे वर्णन केले. त्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि गुप्तचर संस्था आयएसआयवर गंभीर आरोप केले.
 
 

imran khan 
इम्रान खान म्हणाले की, असीम मुनीर मानसिकदृष्ट्या आजारी आणि इतिहासातील सर्वात क्रूर हुकूमशहा आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मला एका अंधाऱ्या, भट्टीसारख्या कोठडीत एकते ठेवले आहे. चार आठवड्यांपासून कोणालाही भेटण्याची परवानगी नाही. तुरुंगातील मूलभूत सुविधा देखील नाकारण्यात आल्या आहेत. त्यांनी सांगितले की, लष्कराने त्यांच्या विरोधात शक्य ते सर्व केले असून आता त्यांच्या जीवावरच धोका निर्माण झाला आहे.
उज्मा खान यांनी भेटीनंतर सांगितले की इम्रान खान शारीरिकदृष्ट्या निरोगी आहेत, परंतु मानसिक छळ सहन करत आहेत. भेटीनंतर तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक निवेदन प्रसिद्ध केले. निवेदनानुसार, इम्रान खानांना मृत्युदंडाच्या कैद्यांसारखी सुविधा उपलब्ध नाहीत, ८५० दिवसांपासून मनमानी पद्धतीने तुरुंगात ठेवण्यात आले आहे, तसेच कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही.
इम्रान खान यांनी स्पष्ट केले की, अटकेशी संबंधित सर्व प्रशासकीय बाबी आयएसआय नियंत्रित करते आणि जर त्यांना काही झाले, तर लष्करप्रमुख आणि आयएसआयचे महासंचालक जबाबदार असतील. त्यांनी सांगितले की, तुरुंगातील कोठडी भट्टीइतकी तापलेली आहे; पाच दिवस वीज नव्हती आणि दहा दिवस त्यांना तिथेच डांबून ठेवण्यात आले. त्यांच्या या खुलाश्यामुळे पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय आणि मानवी हक्कांच्या परिस्थितीवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.