आंतरराष्ट्रीय एड्स दिनानिमित्त इंदिरा गांधी कला महाविद्यालयात भव्य जनजागृती कार्यक्रम

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव,
International AIDS Day awareness इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लबच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एड्स दिनानिमित्त भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 

International AIDS Day awareness, HIV education program, NSS and Red Ribbon Club, student participation, HIV prevention, HIV testing, HIV treatment, social sensitivity, stigma reduction, youth HIV awareness, Raigad college awareness event 
आजच्या आधुनिक युगात एचआयव्ही विषयी गैरसमज व भीती दूर करून समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. शेख उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शनातून त्यांनी विद्यार्थ्यांनी समाजाच्या आरोग्यविषयक प्रश्नांबद्दल जागृत राहून जबाबदार नागरिक म्हणून योगदान देणे आवश्यक असल्याचे सांगितले. एचआयव्ही बाधित व्यक्तींना सहानुभूती, समज व सन्मानाने वागवणे ही खरी मानवता आहे. भीती व अज्ञानामुळे निर्माण झालेला सामाजिक भेदभाव दूर करणे ही आजची तातडीची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या ग्रामीण रुग्णालय राळेगावच्या समुपदेशक डॉ. वर्षा बडणाखे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एचआयव्ही संक्रमणाची कारणे, प्रतिबंधक उपाय, चाचण्या, औषधोपचारातील प्रगती आणि सरकारी योजनेद्वारे उपलब्ध सुविधा याची सविस्तर माहिती दिली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीकांत लाभसेटवार यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही प्रतिबंध आणि संवेदनशीलतेची शपथ देऊन सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारण्याचे आवाहन केले. प्रत्येक तरुणाने एड्सविषयी योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवून गैरसमजांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रा. डॉ. दावडा यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणात अशा सामाजिक जाणीवपूर्वक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रस्तावना रासेयो कार्यक्रम अधिकारी स्वप्नील गोरे यांनी केले. संचालन पायल नांदुरकर हिने केले. आभारप्रदर्शन भावना पराते हिने केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि एनएसएस स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.