पुणे,
Jai Pawar gets married in Bahrain राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचे लग्न नुकतेच मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ सेंटरमध्ये मोठ्या थाटात पार पडले. या लग्नानंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीत व्यस्त झाले आहे, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा जय पवार यांचा विवाह सोहळा येत्या ५ डिसेंबर रोजी परदेशात पार पडणार आहे.
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह बहरैनमध्ये होणार आहे. बहरैन हा मध्यपूर्वेतील पर्शियन आखातीतील एक लहान देश असून, त्याची राजधानी मनामा आहे. या देशाला सौदी अरेबियाशी किंग फहाद कॉजवेने जोडलेले आहे. समोर आलेल्या लग्नपत्रिकेनुसार, हा विवाह चार दिवस चालणार असून, ४ डिसेंबर रोजी मेहेंदी, ५ डिसेंबर रोजी हळदी व वरात व मुख्य लग्नसोहळा, ६ डिसेंबर रोजी संगीत समारंभ आणि ७ डिसेंबर रोजी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले आहेत.
लग्नाचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला तरी, पवार आणि पाटील कुटुंबीयांनी पाहुण्यांची संख्या मर्यादित ठेवली आहे. फक्त ४०० पाहुण्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून फक्त दोन नेते, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ह्या लग्नसमारंभात उपस्थित राहणार आहेत. युगेंद्र पवार यांच्या लग्नानंतर आता जय पवार यांच्या विवाहासाठी पवार–पाटील कुटुंबीय जोरात तयारी करत आहेत.