लेखिकांवर समाजाची जबाबदारी—कांचन गडकरी

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
नागपूर ,
Janmangal Snehamilan जनमंगल लेखिका स्नेहमिलन व पुरस्कार वितरण सोहळा बाबुराव धनवटे सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमाला कांचन गडकरी आशा पांडे, डॉ. शिरीष कुलकर्णी, वैष्णवी बोरगावकर, डॉ. विनिता हिंगे, डॉ. अरुंधती वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना कांचन गडकरी यांनी लेखिकांनी कुटुंबाप्रमाणेच समाजाचीही जबाबदारी पार पाडत असल्याचे सांगितले. लेखिकांच्या जागरूकतेमुळे समाजपरिवर्तनाला बळ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. आशा पांडे यांनी महिला साहित्यिकांचे मोठे योगदान अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. शिरीष कुलकर्णी यांनी स्त्रियांनी लेखनाच्या शक्तीद्वारे समाजाला योग्य दिशा देऊ शकते, असे सांगितले.
 
shilpa
 
 
 
पहिल्या सत्रात जनमंगल दिवाळी अंकाचे लोकार्पण स्वाती हुद्दार यांच्या हस्ते झाले. भारतीय सिनेमाविषयी व्याख्याने, स्वरचित कविता सादरीकरण व अभिवाचन स्पर्धा घेण्यात आल्या.Janmangal Snehamilan स्पर्धांचे निकाल अशा प्रकारे कविता स्पर्धा : प्रथम–स्वाती पोतदार, द्वितीय–जयश्री पांगारकर, तृतीय–मीनल येवलेअभिवाचन : प्रथम–वीणा रणदिवे, द्वितीय–संगीता तांबोळी, तृतीय–शिल्पा नंदनपवार
दुसऱ्या सत्रात समाजकार्य करणाऱ्या जनमंगल यशस्विनींचा सन्मान करण्यात आला.दिनकरराव किन्हीकर स्मृती कृतज्ञता पुरस्कार ‘एक रुपयांची शाळा’ चालवणाऱ्या सखी ढाक यांना प्रदान करण्यात आला.Janmangal Snehamilan तसेच डॉ. अवंतिका टोळे, नेहा मुंजे, सानिका दशसहस्त्र, डॉ. माधवी खोडे व वर्षा बेंडीगेरी कुलकर्णी यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.पुरस्कार वितरण कांचन गडकरी व आशा पांडे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
सौजन्य:शिल्पा नंदनपवार,संपर्क मित्र