करंजा लाड,
Kamargaon Choufuli accident risk करंजा -—अमरावती महामार्गावरील कामरगाव चौफुली एका बाजूला वेगाने धावणारी वाहने, तर दुसर्या बाजूला अचानक रस्त्याच्या मध्यभागी उभे राहणारे प्रवासी ट्रॅव्हल आणि त्या मध्ये अडकलेला साधा नागरिक यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आता सर्वसामान्यांवर आली असून, स्थानिकांचा संताप वाढत चालला आहे.
दररोज सकाळी शाळकरी मुलं, शेतकरी, महिलावर्ग, व्यावसायिक यांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. पण प्रवासी चढविणे—उतरण्यासाठी असलेल्या ठराविक थांब्यांकडे चालक दुर्लक्ष करून महामार्गाच्या मध्यभागीच वाहन थांबवितात. वेगात येणार्या दुचाकी आणि कार चालकांना याचा अंदाज न आल्याने अनेकदा ब्रेक चिरडण्याची वेळ येते. काही वेळा तर थोडयात बचावले असे प्रसंग अगदी डोळ्यांसमोर घडत आहेत. त्यामुळे हीचौफुली आता चौक नाही, थेट अपघातांचा सापळाच बनला आहे.या ठिकाणी यापूर्वी काही किरकोळ अपघात घडले असून, मोठी दुर्घटना घडण्यासाठी केवळ काही क्षणांचीच प्रतीक्षा आहे, अशी भीती सर्वांनाच वाटू लागली आहे. शाळेची वाहने, पिकअप वाहने, मालवाहतूक वाहने व ट्रॅव्हल यांच्या अव्यवस्थित हालचालीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. महामार्ग सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणाचा गंभीर प्रश्न आता पुढे आला असल्याने गावकर्यांनी वाहतूक विभाग, पोलिस प्रशासन आणि संबंधित अधिकार्यांना तातडीने पुढाकार घेऊन ट्रॅव्हल वाहनांच्या मनमानी थांब्यांवर अंकुश आणावा, निश्चित थांबे लागू करावेत, सीसीटीव्ही वा पोलिस गस्त वाढवावी आणि वारंवार अपघातप्रवण बनलेल्या या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.