लाडकाय बहिणींचा हप्ता सध्या लांबणीवर...कधी मिळणार पैसे?

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
मुंबई,
ladki bahin yojana डिसेंबरमध्ये उजाडले तरी “लाडक्या बहिणी” योजना लाभार्थ्यांच्या मनात आता चिंता निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हा हप्ता डिसेंबरच्या सुरुवातीस मिळेल, असा अंदाज होता; मात्र काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतदानामुळे हा हप्ता आता लांबणीवर जाऊ शकतो.
 

ladki bahin yojana 
राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याचा आदेश दिला आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही 20 डिसेंबर रोजी मतदान संपल्याच्या अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत. या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान झाले, तर 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह 154 सदस्यपदांसाठी मतदान आता 20 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे मतमोजणी 21 डिसेंबरपासून सुरू होईल.
 
याआधारे, “लाडक्या बहिणी” योजना लाभार्थ्यांना हप्ता मिळण्याची शक्यता निवडणुका पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे 21 डिसेंबरनंतर आहे. आचारसंहिता लागू असल्यामुळे सध्या कोणतेही पैसे मिळणार नाहीत. योजनेतील पारदर्शकता आणि लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळावा यासाठी ई-केवायसीची सुविधा https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर 18 सप्टेंबरपासून दोन महिन्यांसाठी सुरू करण्यात आली होती. नंतर ही मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत केली गेली आहे. लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केली नसेल, तर त्यांनी ही प्रक्रिया 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करावी, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आवाहन केले आहे.