लाखांदूर,
Lakhandaur Ayurvedic clinic attack, शहरातील साकोली रोडवरील असलेल्या कथित आयुर्वेदिक दवाखान्यात दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास पाच जणांनी घुसून दोन युवकांवर सिमेंटचे दगड आणि बेसबॉल स्टिकने केलेल्या प्राणघातक हल्ल्याने लाखांदूर शहर हादरून गेले. थरकाप उडवणारी ही घटना ता.2डिसेंबर रोजी लाखांदूर शहरात प्रथमच घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेतील गोंधळ, आरडाओरड आणि हाणामारीचे दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केले असून हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड वेगाने वायरल होत शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत. या हल्ल्यावेळी शेकडो नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.
प्राप्त माहितीनुसार,Lakhandaur Ayurvedic clinic attack, अमृतपाल सिंग मलकितसिंग (३२, रा. मंडौली, पंजाब – ह.मु. साकोली) आणि धीरज शर्मा (रा. दोराना, जि. अंबाला) हे दोघे दर महिन्याला साकोली–लाखांदूर परिसरात आयुर्वेदिक औषध विक्री व उपचार करतात. लाखांदूरमध्ये त्यांनी दवाखाना योगेश कुटे यांचा घर भाडेतत्त्वावर घेतला आहे. मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी ते नियमानुसार रुग्णोपचार सुरू करत असतानाच पूर्वीच्या वैद्यकीय व्यवसायातील वादातून निर्माण झालेल्या रागातून पाच जण दवाखान्यात घुसले. यात दिपक अमरपाल सिंग,लवली राजवीर कुमार,सुरेश प्रेमचंद कुमार,अमन बलवान सिंग, अभिषेक रिषीपाल राहणार सर्व हरियाणा असे आहे.दवाखान्यात शिरताच दिपक सिंग आणि लवली राजवीर यांनी प्लास्टिक टेबलचा पाया काढून अमृतपाल यांच्या चेहऱ्यावर व हातावर मारहाण करण्यास सुरूवात केली व सुरेश कुमार यांनी सिमेंटचे दगड फेकून दोघांवर हल्ला चढवला. इतर साथीदारांनीही बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अमृतपाल सिंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर व हातावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. साक्षीदारांच्या मते, काही आरोपी बेसबॉल स्टिकने सुसज्ज होते.हल्ल्याची माहिती मिळताच नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. तेव्हा नागरिकांनी धाडस दाखवत दिपक सिंग आणि लवली राजवीर कुमार यांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी बाकीचे आरोपी पसार झाले होते. दरम्यान ताब्यात घेतलेल्या दोघांनी आपल्या अन्य साथीदारांना लाखांदूर पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर लाखांदूर पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.