माफसूचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन उत्साहात साजरा

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
नागपूर,
25th anniversary celebration महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) नागपूर तर्फे स्थापनेची पंचवीस वर्षे पूर्ण करत रौप्य महोत्सवी वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवार दिनांक २ व ३ डिसेंबर रोजी आयोजित विविध उपक्रमांद्वारे हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, अश्वरोहण क्रीडा, जातीवंत श्वानांचा भव्य डॉग शो आणि आकर्षक मत्स्य प्रदर्शनी अशी विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. क्रिकेट स्पर्धेत परभणी पशुवैद्यक महाविद्यालय विजेता ठरले, तर क्रांतिसिंह नानासाहेब पाटील पशुवैद्यक महाविद्यालय, शिरवळ (सातारा) उपविजेता ठरले. डॉग शोमध्ये २६ जातींच्या शंभरहून अधिक श्वानांनी स्पर्धा रंगवली. चेतन मुदलियार यांच्या जर्मन शेफर्डला प्रथम क्रमांक मिळाला, तर लहान वयोगटात आकाश गोरे यांच्या बॉक्सर श्वानाने बाजी मारली. या शोचे परीक्षण जबलपूर केनेल क्लबचे अध्यक्ष डॉ. अंकुर चौधरी यांनी केले.
 

25th anniversary celebration 
मत्स्य विज्ञान 25th anniversary celebration महाविद्यालयाच्या प्रदर्शनीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शोभिवंत माशांची विविधता, प्लांटेड टँक, नॅनो अक्वेरियम्स आणि स्थानिक मत्स्य प्रजातींनी सर्वांचे विशेष लक्ष वेधले. लहान मुलांनीही या रंगीबेरंगी जगाचा आनंद लुटला. समारोपीय कार्यक्रमाला प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे, कुलगुरू डॉ. नितीन पाटील, मानसोपचार तज्ञ डॉ. सुधीर भावे तसेच विद्यापीठाचे विविध संचालक व अधिकारी उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाचा प्रवास आणि पशुवैद्यक शाखेचे राष्ट्रीय विकासातील महत्व अधोरेखित केले. डॉ. भावे यांनी कार्यताण व वैयक्तिक जीवनातील संतुलनाची गरज स्पष्ट केली. कार्यक्रमात विद्यापीठातील गुणवंत अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.