तिरोडा,
Tiroda police action, नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेदरम्यान तिरोडा पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत 13 आरोपींवर गुन्हे नोंदविले आहेत. आरोपींकडून 2 लाख 31 हजार 200 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यात 4 नोव्हेंबरपासून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. 29 व 30 नोव्हेंबर या कालावधीत तिरोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारुबंदी कायद्यानुसार सलग गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत नीतेश येरकर (32), चंद्रकला उके (50), आशा टेंभेकर (55), प्रमोद राहुल (40), अमित मेश्राम (28), संतोष बिंझाडे (42), दुर्गा पटले (57), प्रवीण मेश्राम (45), राजकुमार खोब्रागडे (54), विजय डोंगरे (52), निशा जगणे (38), माया झाडे (44) आणि सपना बरेकर (45) या आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आरोपींकडून ओल्ड मंक विदेशी दारुचे 80 पव्वे, ज्युपिटर दुचाकी, होंडा अॅक्टीव्हा, 77 लिटर मोहफुलांची हातभट्टीची दारु, तसेच 220 किलो सडवा मोहापास रसायन असा 2 लाख 31 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी ओल्ड मंकच्या 70 बाटल्या आणि होंडा अॅव्हीव्हा असा अतिरिक्त 45 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.