'मराठी माध्यम’ चा टीझर गाजला राव!

‘द फोक आख्यान’ चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळणार

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Marathi Medium movie शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे. टीझरने निर्माण केलेल्या उत्साहात भर घालत दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या सोशल मीडियावर विशेष पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या संगीत टीमची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
 

Marathi Medium movie 
राज्यभरात सध्या अत्यंत Marathi Medium movie  चर्चेत असलेली आणि लोककलेला नवी ओळख मिळवून देणारी ‘द फोक आख्यान’ (<i>The Folk Akhyan</i>) ही लोकप्रिय टीम या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळणार आहे. त्यांच्या दमदार लोककलात्मक शैलीने आणि ठसकेबाज सादरीकरणाने त्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट असून, या चित्रपटासाठी त्यांनी पाच दमदार, खणखणीत आणि रंगतदार गाणी तयार केली आहेत. ‘द फोक आख्यान’च्या हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना गीतकार ईश्वर ताराबाई अंधारे यांची ताकदीची शब्दरचना लाभली आहे.दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी या सहयोगाबद्दल बोलताना सांगितले, “क्रांतिज्योतीसाठी ‘द फोक आख्यान’ची निवड केली कारण त्यांची ऊर्जा, लोककलेविषयीची जाण आणि जमिनीशी असलेले नाते आमच्या चित्रपटाच्या विषयाला अगदी साजेसे आहे. या पाच गाण्यांतून मराठी मातीतली ममता आणि संवेदनशीलता जाणवेल. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणातली ताकद, लय आणि प्रामाणिकपणा आम्हाला या चित्रपटासाठी हवी असलेलीच ऊर्जा देतात.”
 
 
संगीतकार हर्ष-विजय यांनी Marathi Medium movie  आपल्या भावना व्यक्त करत सांगितले, “आमचा हा पहिलाच चित्रपट असल्याने आमच्यासाठी ही अत्यंत खास बाब आहे. महाराष्ट्राच्या लोककलेत वाढलो, त्या मातीतील आवाजातूनच आमची संगीतशैली घडली. आता तीच कला मोठ्या पडद्यावर सादर करण्याची संधी मिळणं हे आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या क्षणांपैकी एक आहे. आम्ही हेमंत ढोमे यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.”‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी येणार आहे. हेमंत ढोमे लिखित-दिग्दर्शित, क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्मस्) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.टीझर आणि संगीत टीमच्या घोषणेनंतर हा चित्रपट वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना मराठी शाळेच्या आठवणीत रोमांचित करणारा अनुभव देणार, अशी चिन्हे दिसत आहेत.