हिवाळ्यात शरीर उबदार ठेवेल... झटपट बनवा मिक्स व्हेज सूप

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
Mix Veg Soup राज्यासह संपूर्ण देशभरात सध्या कडाक्याची थंडी आहे. थंडगार वातावरणामुळे लोकांना सर्दी, खोकला आणि विविध साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. वारंवार सर्दी-खोकल्यामुळे घशात खवखव, सुका खोकला, नाक वाहणे यांसारख्या समस्या वाढत आहेत. या थंडीत शरीरात उष्णता टिकवण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी गरमागरम पदार्थांचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे.
 

Mix Veg Soup  
अशाच Mix Veg Soup गरम पदार्थांपैकी एक म्हणजे मिक्स व्हेज सूप. ही रेसिपी सोपी, पौष्टिक आणि झटपट बनवता येणारी आहे. हिवाळ्यात बाजारात विविध भाज्या सहज उपलब्ध असतात. भाज्यांमुळे शरीराला आवश्यक विटामिन्स, मिनरल्स आणि फायबर मिळतात. लहान मुलांसह मोठ्यांना देखील भाज्या खाण्याची आवड नसते, पण अशा सूपात विविध भाज्या मिसळून खूप स्वादिष्ट पदार्थ तयार करता येतात.
साहित्य:
गाजर, बीटरूट, बटाटा, कांदा, टोमॅटो, हिरवे मटार, लसूण, आलं, कोथिंबीर, काळीमिरी पावडर, मीठ, पाणी.
 
 
कृती:
सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुऊन बारीक चिरा. बटाटा सूपात घालल्यास ते घट्टपणा आणतो आणि चव वाढवतो. कढईत थोडे तूप गरम करून त्यात बारीक चिरलेले लसूण आणि आलं सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. नंतर त्यात कांदा आणि टोमॅटो घालून मिक्स करा. कांदा शिजल्यावर मीठ घालून भाज्या मिक्स करा.
त्यानंतर बारीक Mix Veg Soup चिरलेल्या सर्व भाज्या, शिजवलेला बटाटा आणि मटार कढईत घालून व्यवस्थित मिक्स करा. भाज्यांना हलक्या आचेवर एक वाफ येईपर्यंत शिजवा. त्यानंतर गरम पाणी घालून मिश्रण उकळून आणा. उकळल्यावर काळीमिरी पावडर आणि लिंबाचा रस घालून सूप तयार आहे. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.हे सूप फक्त पौष्टिकच नाही तर हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासही उपयुक्त आहे. थंडीच्या दिवसांमध्ये झटपट तयार होणारे हे मिक्स व्हेज सूप संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल आणि आरोग्यही टिकवेल.