उत्तर प्रदेश,
Munni Devi love story प्रेम आंधळं असतं, अशी म्हण पुन्हा एकदा खरी ठरवणारी घटना अंबेडकरनगरच्या जहांगीरगंज परिसरातील हुसेनपूर खुर्द गावात उघडकीस आली आहे. पाच मुलांची आई असलेल्या एका महिलेने आपल्या पतीला आणि कुटुंबाला मागे टाकत, मोठ्या मुलाच्या वयाच्या तरुणासोबत दुसरे लग्न केल्याची प्रकरण ग्रामीण भागात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.
मुन्नी देवी असे महिलेचे नाव असून, तिचे पती आणि पाच मुलांसह संसार सुरू होता. देवरिया जिल्ह्यातील भटनी पोलीस स्टेशन परिसरात भंगार गोळा करण्याचे काम करणारा निखिल हा तरुण अधूनमधून हुसेनपूर खुर्दमध्येही फेरी मारत असे. भंगार खरेदी करण्याच्या दरम्यान मुन्नी देवी आणि निखिल यांची भेट झाली. सुरुवातीला साध्या ओळखीपासून सुरू झालेला हा संबंध हळूहळू प्रेमसंबंधात बदलला.मुन्नी विवाहित असतानाही तिच्या आणि निखिलच्या नात्याला दोघांनीही आडकाठी येऊ दिली नाही. मुन्नीचे वय आणि तिची पाच मुलांची आई ही ओळख निखिलसाठी महत्त्वाची ठरली नाही. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर गावात आणि कुटुंबात खळबळ उडाली. पतीला या नात्याची माहिती मिळताच दाम्पत्यामध्ये तणाव वाढला. समाजाच्या टीकेचा सामना करतानाही मुन्नीने आपला निर्णय कायम ठेवला.
शेवटी पतीनेही Munni Devi love story “तिला माझ्यासोबत राहायचे नसेल, तर मी काय करू शकतो?” अशा भावनिक शब्दांत हार मानली. त्यानंतर मुन्नी आणि निखिल यांनी आलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका प्रसिद्ध हनुमान मंदिरात हिंदू रीतीरिवाजांनुसार विवाह केला. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे या विवाहाला मुन्नीचा पती स्वतः हजर होता.घटनेचे वृत्त गावभर पसरताच चर्चा आणि आश्चर्याची लाट उसळली. काहींनी या प्रेमकथेवर टीका केली, तर काहींनी दोघांच्या निर्णयाला वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणून स्वीकारले. मात्र इतके निश्चित की, या अनोख्या लग्नप्रकरणाने गावातील वातावरण चांगलेच तापवले असून, ही कथा स्थानिक पातळीवर चर्चेचा प्रमुख विषय बनली आहे.