फ्लोरिडा
Poorstacy Death फ्लोरिडामध्ये जन्मलेले रॅपर पूअरस्टेसी (Poorstacy) यांचे वयाच्या २६ व्या वर्षी निधन झाले आहे. पाम बीच काउंटी मेडिकल एक्झामिनरने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली असून, बोका रॅटन पोलिसांनीही “घटनेनंतर” रॅपरचे निधन झाल्याची माहिती दिली आहे, असे पेज सिक्सने वृत्त दिले आहे. अद्याप पूअरस्टेसीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
पूरस्टेसी हिप-हॉप, पंक रॉक आणि मेटल या शैलींचा अनोखा संगम सादर करणाऱ्या कलाकारांमध्ये ओळखले जात होते. त्यांनी अनेकदा ट्रॅव्हिस बार्करसोबत सहकार्य केले आणि “चूज लाईफ”, “नथिंग लेफ्ट”, “हिल्स हॅव आयज” यासह अनेक गाण्यांवर काम केले आहे. याशिवाय गायक-रॅपर इयान डायरसोबतही त्यांनी सहकार्य केले असून, ग्रॅमी-नामांकित “बिल अँड टेड फेस द म्युझिक” साउंडट्रॅकवरही त्यांचे योगदान आहे.
पूरस्टेसीने Poorstacy Death दोन स्टुडिओ अल्बम आणि दोन ईपी रिलीज करून मोठा चाहता वर्ग तयार केला होता. त्यांच्या संगीताने अनेकांच्या जीवनावर प्रभाव टाकला असून, चाहत्यांनी त्यांच्या निधनाची बातमी ऐकून सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. अनेक कलाकारांनी देखील पूअरस्टेसीच्या कलाकृतींमध्ये मानसिक आरोग्याच्या संघर्षाचे प्रतिबिंब दिसते, असे सांगत श्रद्धांजली वाहिली आहे.तब्बल २६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी संगीताच्या माध्यमातून एक अद्वितीय ठसा सोडला. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या गाण्यांवरील प्रेम आणि त्यांची अद्वितीय शैली कायम आठवणीत राहणार आहे.