पुलगाव,
pulgaon-news : सोनेगाव (आबाजी) परिसरातील केंद्रीय दारूगोळा भंडारातील निकामी बॉम्बचे तुकडे जमा करीत असताना फुटलेल्या बॉम्बचा एक तुकडा लागून संदीप तुमडाम (३०) रा. केळापूर याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज बुधवार ४ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
देवळी तालुयातील पुलगाव नजिक असलेल्या सोनेगाव परिसरापर्यंत केंद्रीय दारूगोळा भंडाराचा परिसर आहे. येथे मुद्दत बाह्य बॉम्ब निकामी केले जातात. या निकामी बॉम्बचे तुकडे व इतर साहित्य गोळा करून काही लोक त्यांची विक्री करतात. हेच साहित्य विकून ते पैसेही कमवतात. अशाच प्रकारे बुधवारीही या निकामी बॉम्बचे तुकडे गोळा करण्यासाठी काही लोक गेले होते. अशाचत निकामी करण्यात आलेल्या बॉम्बचा एक तुकडा संदीप तुमडाम याला लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. संबंधित घटना उघडकीस आल्यावर देवळी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच देवळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.
ते प्रतिबंधित क्षेत्र
सोनेगाव (आबाजी) परिसरात येणार्या ज्या ठिकाणी निकामी करण्यात आलेल्या बॉम्बचा तुकडा लागून संदीत तुमडाम याचा मृत्यू झाला. ते क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून केंद्रीय गोळा भंडार प्रशासनाने पूर्वीच जाहीर केले आहे. असे असतानाही काही लोक या ठिकाणी निकामी बॉम्बचे तुकडे गोळा करण्यासाठी जातात.