कानाचा दुर्मिळ कॅन्सर बरा; ७५ वर्षांचे आजोबा ऐकू लागले

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
rare-ear-cancer-cured : जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलमधील रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि मेडिकल ऑन्कोलॉजिस्टच्या चमूने वर्धा येथील ७५ वर्षीय रुग्णावर चौथ्या स्टेजमधील बाह्य भवन नलिका (एसटर्नल ऑडिटरी कॅनल) कॅन्सरवर यशस्वी उपचार केले. या यशस्वी उपचारामुळे रुग्णाचे जीवन वाचले असून त्याचे कानही सुरक्षित राहिले.
 
 

jik 
 
 
वृद्ध रुग्णाला तीन महिन्यांपासून डाव्या कानात तीव्र आणि सतत वेदना जाणवत होत्या तसेच कानाच्या आत वाढणारी गाठही दिसत होती. सीटी स्कॅनमध्ये ३ सेंमी आकाराचा दुर्मिळ ट्यूमर आढळला, जो कानाच्या नलिकेच्या हाडांना शिजवत मधल्या कानापर्यंत पसरलेला होता. गाठीची बायोप्सी करण्यात आली असता वेल-डिफरेंशिएटेड स्कॅमस सेल कार्सिनोमा कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले. रेडिएशन, मेडिकल आणि सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट टीमच्या चर्चेनंतर रुग्णाला केमो रेडिओथेरपी उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
 
डॉ. तेजश्री तेलखडे-वडतकर यांनी डाव्या कानावर एस्टर्नल बीम रेडिएशन बेरपी (ईबीआरटी) काळजीपूर्वक नियोजित केली. रुग्णाची तपासणी केल्यानंतर डॉ. अमन सोंडीले यांनी आठवड्याला एकदा किमोथेरपी दिली. डॉ. तेजश्री तेलखडे यांनी सांगितले की, बाह्य श्रवण नलिका कॅन्सर हा अतिशय दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर आहे. तो कानाजवळील हाडांमध्ये, पैरोटिड ग्रंथीत किंवा मेंदूकडे पसरू शकतो. हा कॅन्सर डोयाचा आणि मानेचा कॅन्सरमध्ये ०.२ टके पेक्षा कमी प्रकरणांमध्ये आढळतो.
 
 
चौथ्या स्टेजमध्ये या कॅन्सरची शस्त्रक्रिया करून ट्यूमर पूर्णपणे काढणे अनेकदा शय होत नाही. किमो रेडिओथेरपीनंतर तीन महिन्यांनी केलेल्या फॉलो-अप सीटी स्कॅनमध्ये प्रभावित ठिकाणी कॅन्सरचे कोणतेही लक्षण आढळले नाही. दीड वर्षानंतरही रुग्ण पूर्णपणे निरोगी आणि आजारमुत आहे. ही केस वेळेवर निदान, तज्ज्ञांची एकत्रित मेहनत आणि आधुनिक कॅन्सर उपचारांचा प्रभावी वापर करून गुंतागुंतीच्या कॅन्सर प्रकरणांवरही मात करता येऊ शकते याचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.