सालेकसात ईव्हीएमची सील तुटली?

तहसील कार्यालयात उमेदवार, नागरिकांचा राडा

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
गोंदिया,
Salekasa Nagar Panchayat election जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीसाठी मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रीया पार पडली. यानंतर सर्व मतदान यंत्र स्ट्रांग रुम येथे ठेवण्यात आले. दरम्यान आज 3 डिसेंबर रोजी उमेदवार व नगरवासीयांना मतदान यंत्रांची सील तुटल्याची माहिती मिळताच त्यांनी तहसील कार्यालय गाठून संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारत गोंधळ घातला. यावेळी पोलिसानाही पाचारण करण्यात आले होते.
 

Salekasa EVM seal controversy, Salekasa Nagar Panchayat election, 
सालेकसा Salekasa Nagar Panchayat election  नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व 17 नगरसेवकांसाठी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले. येथे जिल्ह्यात सर्वाधिक 85 टक्के मतदान झाले. मतदानानंतर उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये सर्व मतदान यंत्र ऑन ऑफ आणि सीलकरून तहसील कार्यालयाच्या स्ट्राँगरूममध्ये नेण्यात आले. आज काही उमेदवार व नगरवासीयांना मतदान यंत्रांचे सील तुटल्याची माहिती मिळाली. यानंतर उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह तहसील कार्यालय गाठले. ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे सालेकसा तहसील कार्यलयात एकच गोंधळ उडाला. उमेदवार, प्रतिनिधींना पूर्व सूचना देण्यात आली नाही. ईव्हीएमचे सील तोडून त्यांच्यात छेडखानी तर करण्यात आली नाही? अशी शंका उमेदवारांनी व्यक्त केला आहे. या प्रकारानंतर सालेकसा येथे तणावपूर्ण वातावरण आहे. स्टॉग रूम परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान स्टाँग रूम व परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासावेत, निवडणूक रद्द करून पुन्हाहून निवडणूक घ्यावी, दोषी अधिकार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी उमेदवार व नगरवासीयांनी यावेळी केली.
सर्व इव्हीएम सुरक्षित - तहसीलदार कांबळे
तांत्रिक तपासणीचा भाग म्हणून म्हणून स्वीच ऑन ऑफ आहे की नाही हे आम्ही कंट्रोल युनिट पाहिलं. मतदान यंत्रात कोणतीही छेडछाड झाली नाही. सर्व ईव्हीएम सुरक्षित असल्याचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांनी सांगीतले.